​रेनो ट्रायबर एएमटीच्या बुकिंगला सुरुवात

मुंबई​ :
रेनो​ने ट्रायबर इझी-आर एएमटीचे बुकींग ​सुरु केले असून, रेनो ट्रायबर इझी -आर एएमटी तीन ट्रीम्स – आरएक्सएल, आरएक्सटी आणि आरएक्सझेडमध्ये ​उपलब्ध आहे. ​​ट्रायबर इझी -आर एएमटी खासकरून भारतीय बाजारांसाठी तयार करण्यात आली असून बी-सेगमेंट कारकरिता इच्छुक असणाऱ्या ग्राहकांसाठी ​हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. 
रेनो ट्रायबर इझी -आर एएमटीचे ऑनलाइ​​न बुकींग https://renault.co.in, माय रेनो अॅपवर किंवा रेनोच्या अधिकृत विक्रेत्यांकडे उपलब्ध ​आहे. कंपनीच्या वतीने आजपासून बुकींग सुरू केली असून आगामी आठवड्यांमध्ये डिलिव्हरीला सुरुवात होणार आहे. ग्राहकांना विक्रेत्यांकडे आजपासून सुरू होणाऱ्या इझी -आर एएमटी ड्राईवचा अनुभव घेता येणार आहे.

ओकिनावाकडून डिलर मार्जिन्समध्ये वाढ
t
​’​ट्रायबरच्या एएमटी वर्जनसमवेत आम्ही ट्रायबरचा युएसपी – लवचीक​,​ आकर्षक आणि किफायतशीर आणखी वृद्धिंगत करू. ग्राहकांची बदललेली आवड लक्षात घेता एएमटी टेक्नॉलॉजी सर्वच सेगमेंटमधील आवडती पसंती ठरली आहे. ​आज रेनो ट्रायबर इझी -आर एएमटीच्या शुभारंभासोबत ट्रायबर प्रवासात आम्ही एक पाऊल पुढे टाकले आहे,” असे रेनो इंडिया ऑपरेशन्सचे कंट्री सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर वेंकटराम मामिल्लापाल्ले यांनी सांगितले.
रेनो ट्रायबर इझी -आर एएमटी ही तीन ट्रीम्स – आरएक्सएल, आरएक्सटी, आरएक्सझेडसह 25 हून अधिक मुख्य वैशिष्ट्ये उपलब्ध करून देते. त्यामुळे हे सर्व ट्रीम्समध्ये स्टँडर्ड इक्विपमेंट ठरते. यामध्ये 30 पेक्षा अधिक दर्जेदार वैशिष्ट्ये जसे की, इझीफिक्स सीट, एसयुव्ही स्किड प्लेट्स, एलईडी इंस्ट्रृमेंट क्लस्टर, 2 ऱ्या आणि 3 ऱ्या रांगेत वेंट्ससह ट्वीन एसी, स्टाईल्ड फ्लेक्स व्हील्स, 182 एमएम आणि 20.32 सीएम (8 इंच) हाय ग्राउंड क्लिअरन्स टचस्क्रीन मीडियानाव इवोल्युशन सिस्टीमसोबत उपलब्ध आहे.


​रेनो ट्रायबर इझी -आर एएमटीमध्ये एनर्जी इंजिन – 1.0 – लिटर पेट्रोल इंजिन, सोबतच कामगिरी आणि इंधन अर्थकारणात सर्वोत्तम संतुलन राखते. याचा देखभाल खर्च देखील सर्वात कमी आहे. रेनोच्या वतीने ट्रायबरची निर्यात दक्षिण आफ्रिका आणि सार्क प्रदेशात सुरू केली आहे. रेनोने आपला वृद्धी दर कायम राखला असून आफ्रिकेच्या इतर भागांत आणि सार्क प्रदेशात निर्यातीला चालना दिली आहे, याशिवाय भारतात देखील ट्रायबर कुटुंब वाढते आहे. ​रेनो​ने 2019 ​मध्ये 88,869 युनिट्सची विक्री ​आणि 13,500 कारची निर्यात करण्यात आली​ होती.
ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here