शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक

sa

मुंबई :
निफ्टी आणि सेन्सेक्सने ३ दिवसांचे नुकसान झेलल्यानंतर भारतीय शेअर बाजार आज सकारात्मक स्थितीत बंद झाला. निफ्टी ०.६३% किंवा ५५.८५ अंकांनी वाढून ८८७९.१० वर बंद झाला. तर दुस-या बाजूला सेन्सेक्स ०.५६% किंवा १६७.१९ अंकांनी वाढून ३०,१९६ अंकांवर बंद झाला. भारती एअरटेल हा निफ्टीतील सर्वाधिक म्हणजेच ११ टक्क्यांची वृद्धी घेणारा शेअर ठरल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले.

टॉप गेनर्स आणि लूझर्स:
११ सेक्टोरल गेजेसपैकी ६ सेक्टर्सनी वृद्धी नोंदवली. यात आयटी, मेटल, एफएमसीजी आणि ऑटो क्षेत्रांनी निफ्टीवर ०.७५ ते १.२ टक्क्यांची वाढ दर्शवून ते टॉप गेनर्स ठरले. भारती एअरटेलचा शेअर ११ टक्क्यांनी वाढून तो टॉप गेनर ठरला. हा शेअर ५९६.२० रुपये किंमतीवर बंद झाला. नफा कमावलेल्या इतर शेअर्समध्ये आयटीसीचा समावेश असून त्याने ३.६४%ची वृद्धी घेऊन १७०.७५ रुपयांवर विश्रांती घेतली. पॉवर ग्रिडचे शेअर २.३३% नी वाढून 158.10 रुपयांवर बंद झाले. जेएसडब्ल्यू स्टीलने ३.८३ टक्क्यांनी उसळी घेऊन १७०.७५ रुपयांवर बंद झाला. ओएनजीसीने ५.९६%, अदानी पोर्ट्स ९ %, अल्ट्रा टेक सिमेंट ४.१५ टक्के आणि एनटीपीसीची शेअर २.१९ टक्क्यांनी वाढले.
पॅकेजचा बाजारावर काहीच परिणाम नाही
c
निफ्टी मार्केट लूझर्समध्ये वेदान्ता, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो, सिपला, अॅक्सिस बँक, एचयूएल, एसबीआय आणि युपीएलचा समावेश आहे. सेन्सेक्सचे नेतृत्व करणारा रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर आज सकारात्मक स्थितीत सुरु झाला. पण सेशनच्या शेवटी त्याने नफा गमावला. हा शेअर २.२६ टक्क्यांनी म्हणजेच १,४०८.१५ रुपयांनी घसरला. बुधवारी कंपनीने आपला हक्कांचा मुद्दा सुरू केला. एचडीएफसी बँकेचे शेअर ०.५९ टक्क्यांनी घसरून ८३१.५० अंकांवर थांबले. तर एफएमसीजीतील प्रमुख हिंदुस्तान युनिलिव्हर १.५६ टक्क्यांनी घसरून १९७४.५० रुपयांवर स्थिरावला.

टेलिकॉम सेक्टरमध्ये वृद्धी:
कोव्हिड-१९ मुळे संपूर्ण देश लॉकडाउनच्या स्थितीत आहे. लोक घरातच अडकले असून मोबाइल डिव्हाइस तसेच डेटा प्लॅनमुळे त्यांची थोडी तरी सुटका होत आहे. मोबाइल दर आणि डेटा प्लॅनवरील वाढीव खर्चामुळे टेलिकॉम क्षेत्राच्या सरासरी महसुलाला चालना मिळाली. प्रत्येक वापरकर्त्याकडून मिळणा-या सरासरी उत्पन्नात २५ टक्के वाढ झाली.

वाढीव लॉकडाउनमुळे बाजाराच्या भावनांवर परिणाम:
वाढीव लॉकडाउनची घोषणा ते कोव्हिड-१९च्या नव्या केसेस सापडणे, याचा बाजाराच्या स्थितीवर वाईट परिणाम झाला. सरकारने घोषित केलेल्या आर्थिक पॅकेजमुळे गुंतवणूकदार निराश असून आणखी वाईट स्थितीची अपेक्षा केली जात आहे. परिणामी बँक आणि एनबीएफसीने तीव्र घसरण अनुभवली. निफ्टी पीएसयू बँक निर्देशांकाला मोठा फटका बसला असून त्याने २.६ टक्क्यांची घसरण दर्शवली.

ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here