नवी दिल्ली :
बर्गर किंग इंडियाने (burger king) कोव्हिड- 19 च्या पार्श्वभूमीवर अनाथालयांमध्ये बर्गर्सचे वाटप करण्यासाठी दिल्ली पोलिसांशी भागिदारी केली आहे. पालम गावातील डॉन बॉस्को अशालायम आणि ऑक्सिलियम स्नेहालय तसेच द्वारकामधील आशा गृह चिल्ड्रेन होम फॉर बॉइज अँड गर्ल्स यांना मधल्या वेळेचे खाणे म्हणून बर्गर्सचे वाटप करण्यात आले. त्याशिवाय विकास पुरी, जीटीबी एनक्लेव्ह, मधू विहार, आर. के. पुरम आणि काल्काजी येथील जेजे क्लस्टर्समधील मुलांनाही बर्गर्स देण्यात आले. या भागिदारीचा एक भाग म्हणून बर्गर किंगने (burger king)5000 बर्गर्सचे वाटप केले.
लॉकडाउनमध्ये फिट रहा, लाखो कमवा…
बर्गर किंग इंडियाच्या ‘क्राउन स्टँडर्ड डिलीव्हरी’मध्ये स्वयंपाकघरातील अन्नाचे समाजाला सुरक्षितपणे वाटप केले जाते. जेवण वाटप करणारे कर्मचारी मास्क, ग्लोव्हसारखी संरक्षक उपकरणे परिधान करतात. कोव्हिड- 19 चा उद्रेक झाल्यापासून बर्गर किंगने आपल्या रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांची सुरक्षितता, एकंदर स्वच्छता वाढवली असून देशभरातील सर्व रेस्टॉरंट्स स्वच्छ करण्याची वारंवारताही वाढवली आहे.
बर्गर किंगचे सीएमओ श्रीनिवास अडापा म्हणाले, ‘आम्ही नियमितपणे पोलिसांबरोबर काम करत असून या अनपेक्षित काळात ते देशासाठी करत असलेल्या निस्वार्थी कामाबद्दल आम्ही त्यांना सलाम करतो. या गरजेच्या काळात मुलांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्न पुरवण्यासाठी दिल्ली पोलिसांबरोबर भागिदारी करण्याची संधी मिळणे हा आमचा सन्मान आहे.’ दिल्ली पोलिसांनीही कंपनीच्या या कामाचे कौतुक करत लहान मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणाऱ्या उपक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल आनंद झाल्याचे सांगितले.
अर्थ-उद्योग जगतातील ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज.