​कॅनरा बँकेतर्फे​ आता विशेष गोल्ड लोन​​

बंगळूरू​ :
सध्या​च्या महामारीमुळे देशातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती कठीण बनली आहे आणि अनेक लोकांसाठी रोजचा खर्च, व्यावसायिक खर्च, आरोग्य आणि परिवाराचा खर्च यांची तरतूद करणे अनेकांसाठी आव्हानात्मक बाब बनू लागली आहे. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील चौथी सर्वात मोठी बँक असलेल्या कॅनरा बँकेने ​यासाठीच व्यावसायिकांसाठी विशेषकरून गोल्ड लोन ची सुरूवात केली आहे. ग्राहकांना कमी व्याज दरात वेगाने आणि सोप्या पध्दतीने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकेने गोल्ड लोन सुविधा सुरू केली आहे. या कर्जामुळे ग्राहकांची खेळत्या भांडवलाची गरज भागवली जाऊन त्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढवण्याकरता आवश्यक रक्कम मिळाल्याने त्यांचे जीवन पूर्वपदावर येण्यास मदत होईल.  याच उद्देशाने बँकेने ३० जून  २०२० पर्यंत विशेष गोल्ड लोन मोहिम सुरू केली असून याकरता ७.८५ टक्के वार्षिक व्याजदर आकारण्यात येणार आहे.
या कर्जाचा उपयोग व्यावसायिकांना कृषी आणि संबंधित कामे, व्यावसायिक गरजा, आरोग्यविषयक गरजा, वैयक्तिक गरजा इत्यादी सारख्या गरजा पूर्ण करण्यासाठी होऊ शकेल.​ ​ही कर्ज सुविधा संपूर्ण भारतातील काही विशिष्ट शाखांमध्ये उपलब्ध आहे.
यावेळी बोलतांना  कॅनरा बँकेचे जनरल मॅनेजर ​​डी विजय कुमार यांनी सांगितले “सोनं एक बहुमूल्य अशी वस्तू आहे आणि ती भारतीय घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर दागिने आणि नाण्यांच्या रूपात सापडते, तरीही या वस्तूचा उपयोग पैसे उभे करण्यासाठी कमी प्रमाणात होतांना दिसतो. अगदी गरजेच्या वेळी या मालमत्तेचा उपयोग करून तुमच्या रोखीच्या तत्कालीन गरजा पूर्ण होणे शक्य आहे.”
…म्हणून  वधारला सोन्याचा भाव
​ canara
​यासाठी मिळणार गोल्ड लोन ​:​
१. शेती विषयक काम आणि पीक लागवडीचे काम – या कर्जाचा लाभ दागिने तारण ठेऊन घेणे शक्य असून यांत पिकांसाठी येणारा खर्च भागवण्यासाठी १० लाख रूपयांपर्यंत कर्ज घेणे शक्य आहे. 
२. शेतीशी सबंधित अन्य कामांसाठी –  या कर्जाचा लाभ हा शेतीशी संबंधित अन्य कामे/ जमिनीचा विकास करण्यासाठी घेता येतो.  याकरता कर्जदार अधिकत रू. २० लाखांचे कर्ज घेऊ शकतो. 
३. शेतकर्‍यांच्या सोन्याच्या दागिन्यांना तारण ठेऊन ओडी सुविधा  (जीएल-ओडी)- शेतीशी संबंधित अन्य खर्च भागवण्यासाठी जसे बियाणांचा खर्च, खते, ‍किटकनाशके, पीक, सिंचनाचा, कामगारांचा खर्च तसेच कृषी व जमिनीच्या विकासाशी संबंधित अन्य खेळत्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी ही सुविधा वापरणे शक्य आहे.   याकरता किमान रक्कम ही १.६० लाखां पासून ते पीक लागवडीसाठी अधिकतर ओडी हा रू १० लाखांपर्यंत तर जमिनीशी संबधित अधिकतर ओडी रू २० लाख आहे.  
४. वैयक्तिक कर्ज योजना ‘स्वर्ण लोन्स’ चा उपयोग वैद्यकीय खर्च, घरगुती खर्च, व्यावसायिक खर्च किंवा अचानक उद्भवणार्‍या खर्चाला भागवण्यासाठीही करणे शक्य आहे. याकरता अधिकतर कर्ज हे रू २० लाखांपर्यत उपलब्ध आहे​. ​

व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा… 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here