‘एमएसएमई’साठी आता ‘कॅनरा क्रेडिट सपोर्ट’

बंगळूरू :
कोविड-१९ च्या साथीमुळे निर्माण झालेल्या तात्पुरत्या स्वरूपाच्या खेळत्या भांडवलाची कमतरता भरून काढण्याच्या उद्देशाने कॅनरा बँकेतर्फे ‘कॅनरा क्रेडिट सपोर्ट’ या कोविड-१९ च्या साथीमुळे संकटात सापडलेल्या सध्याच्या कर्जदारांसाठी असलेल्या विशेष सुविधेची घोषणा केली. कॅनरा क्रेडिट सपोर्ट ही सुविधा म्हणजे वेगाने आणि सहजपणे कर्जाची उपलब्धता करून देणारी सुविधा असून यामुळे व्यावसायिकांना कायदेशीर देणी, पगार/रोजंदारी/उर्जेची बिले, भाडे इत्यादी देणी देणे शक्य होणार आहेत.
आजमितीस कॅनरा बँकेने जवळजवळ ४३०० कोटी रूपयांची जवळजवळ ६ लाख रूपयांपर्यंतची कर्जे ही कृषी, एसएचजीज आणि रिटेल विभागात वितरीत केली आहेत.  बँकेने विविध योजनांचा एसएमएस, कॉल सेंटर्स, ईमेल्स, वैयक्तिक कॉल्स च्या माध्यमातून प्रसार करून पात्र असलेल्या कर्जदारा पर्यंत संपर्क साधण्यास सुरूवात केली आहे.
अशा कठीण समयी ग्राहकांना सर्वोत्कृष्ट अनुभव देऊन कर्ज देण्यामध्ये मोठी आघाडी घेतली आहे.  बँकेने मार्च २०२० पासून आजपर्यंत विविध कर्पोरेट्स आणि एमएसएमईज ना ६०हजार कोटी रूपयांची कर्जे वितरीत केली आहेत.
‘२१ दिवसांत भरा, ७१७ दशलक्ष डॉलर’
canara bank
त्याच बरोबर भारत सरकारने २९ फेब्रुवारी २०२० रोजी थकबाकी असलेल्या कर्जदारांची २० टक्क्यांपर्यंतची इमर्जन्सी क्रेडिट लाईन वाढवण्यात आली असून १००.०० कोटी रूपयांपर्यंत वार्षिक उलाढाल असलेल्या एमएसएमई कर्जदारांमधील २५ कोटींपर्यंतची थकबाकीची पत देण्यात आली आहे.  या क्रेडिट लाईनला भारत सरकारने १०० टक्के गॅरेंटी प्रदान केली आहे.  या सुविधेचा लाभ कर्जदार कधीही अटी आणि नियमांनुसार ३१.१०.२०२० पर्यंत कधीही घेऊ शकतात. 
या विषयी बोलतांना कॅनरा बँकेचे एमडी आणि सीईओ एल व्ही प्रभाकर यांनी सांगितले “कॅनरा बँकेने नेहमीच ग्राहकाभिमुखता दाखवत ग्राहकांची जबाबदारी घेऊन कोविड १९ योजनांचे वाटप वेगाने केले आहे.  आमची सर्व कार्यालये आणि शाखा या सातत्याने ग्राहकांपर्यंत पोहोचणे ही आजची गरज आहे.  आंम्हाला खात्री आहे की ज्यावेळी लॉकडाऊन पूर्णत: उठेल तेंव्हा आमच्या ग्राहकांना पूर्णपणे मान्य करण्यात आलेल्या सुविधा वापरता येतील तसेच त्यांचा व्यवसायही वाढवता येईल.” 

व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here