केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता स्थगित

central employees

नवी दिल्ली :
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतनधारकांना एक जानेवारी २०२० पासून देय असलेला महागाई भत्ता सध्या देण्यात येणार नसल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. देशातील कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची अतिरिक्त देय रक्कम आणि केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांना महागाई मदत सध्या मिळणार नाही. एक जानेवारी २०२० पासून देय असलेली ही रक्कम सध्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार नाही.
त्याचबरोबर एक जुलै २०२० आणि एक जानेवारी २०२१ पासून देय असलेली महागाई भत्त्याची अतिरिक्त देय रक्कमही येत्या काळात देण्यात येणार नसल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.
central employees
रेल्वेची 3.13 लाख टन अन्नधान्याची विक्रमी वाहतूक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here