2 ते 3 दिवसांत मिळणार नवीन पॅकेज

Package

नवी दिल्ली :
कोरोनाच्या संकटात उद्योगांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच दिलासादायक पॅकेज (package) जाहीर करणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तेलंगणातील उद्योग व वाणिज्य सदस्यांशी झालेल्या संभाषणादरम्यान केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग व परिवहन मंत्री आणि एमएसएमई खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी हि माहिती दिली. ते म्हणाले, येत्या 2 ते 3 दिवसांत सरकार मदत पॅकेज (package) जाहीर करेल. सरकारला आपल्या मर्यादा आहेत. प्रत्येकाला वाचवण्यासाठी आम्ही आमच्या पातळीवर शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं आहे.

package
‘देशांतर्गत उत्पादनावर भर देण्याची गरज’

एमएसएमई मंत्रालयाने वित्त मंत्रालय व पंतप्रधान कार्यालया(पीएमओ)ला आपल्या शिफारसी पाठवल्या आहेत. लघु उद्योगांना वेळेवर थकबाकी परतावा मिळावा आणि त्यांच्या व्यवसायात अडचणी येऊ नयेत, यासाठी केंद्र सरकार 1 लाख कोटी रुपयांच्या मदत पॅकेजवर काम करत असल्याचंही गेल्या महिन्यात नितीन गडकरींनी सांगितलं होतं.
लॉकडाऊनचा सर्वाधिक परिणाम सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रावर झाला आहे. हे क्षेत्र देशाच्या जीडीपीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि कोट्यवधी लोकांना रोजगार देते. गरीब, शेतकरी आणि लहान व्यावसायिकांसाठी अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) कित्येक महत्त्वाची पावलं उचलली आहेत. परंतु असे असले तरी एमएसएमई क्षेत्राला बळ देण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे. केंद्र सरकार सर्व उद्योगांना सतत पाठिंबा देत आहे. व्यावसायिकांनीही हे समजून घ्यावे लागेल की सरकारची आर्थिक स्थितीदेखील दडपणाखाली आहे, असंही नितीन गडकरी म्हणाले आहेत. 
ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here