‘केमकॉन’चा आयपीओ 21 सप्टेंबर पासून 

chemcon

मुंबई :
विशेष रसायनांचा अग्रगण्य निर्माता असलेल्या केमकॉन स्पेशियलिटी केमिकल्स लिमिटेडचा प्राथमिक सार्वजनिक प्रस्ताव दिनांक 21 सप्टेंबर 2020 रोजी खुला करण्यात येणार असून दिनांक 23 सप्टेंबर 2020 रोजी बंद होईल. या व्यवहारासाठी किंमत पट्टा प्रती इक्विटी समभाग Rs. 338 – Rs. 340 याप्रमाणे राहील. या व्यवहारासाठी दिनांक 18 सप्टेंबर 2020 रोजी बोली/प्रस्ताव खुला होण्याआधी एक कार्यालयीन दिवसापूर्वी पायाभूत गुंतवणुकदारांनी बोली दाखल करून वाटप प्रक्रियेत सहभागी होता येईल. ही कंपनी हेक्सामिथाईलडीसायलाझने (HMDS) आणि क्लोरोमिथाईल इसोप्रोपाईल कार्बोनेट (CMIC) अशा विशेष रसायनांची अग्रगण्य निर्मितीदार असून रसायनांचा वापर औषधनिर्मिती क्षेत्रांद्वारे करण्यात येतो. तेलखाण उद्योग क्षेत्रात महत्त्वाच्या इनऑर्गनिक ब्रोमाईड्सची निर्मिती या कंपनीद्वारे करण्यात येते.
फ्रॉस्ट अँड सुल्लीवन रिपोर्ट अनुसार ही कंपनी भारतात एचएमडीएसची केवळ एकमेव निर्मितीदार आहे. चालू वर्ष 2019 मध्ये निर्मितीच्या दृष्टीने एचएमडीएसची तिसरी सर्वात मोठी निर्मितीदार ठरली. पुढे फ्रॉस्ट अँड सुल्लीवन रिपोर्ट अनुसार कंपनी भारतात सीएमआयसी निर्मितीमधील पहिली सर्वात मोठी निर्मितीदार असून जगात दुसऱ्या क्रमांकाची निर्मितीदार आहे. या कंपनीने सध्या 2 नवीन उत्पादने विकसीत केली असून त्यांची नावे 4-क्लोरोब्यूटारल क्लोराईड (‘4CBC’) आणि 2,5 डीएचटी (2,5-डायड्रोक्सी-1,4-डीथाईन) अशी आहेत. जुलै 2020 दरम्यान 4 सीबीसी’ची पहिली विक्री यापूर्वीच करण्यात आली आहे.
बीआरएलएमच्या मार्गदर्शनातंर्गत तसेच एसईबीआय आयसीडीआर तरतुदीनुसार कंपनी आणि विक्रेता समभागधारकांसह पायाभूत गुंतवणुकदारांचा सहभाग ग्राह्य धरण्यात आला आहे. पायाभूत गुंतवणुकदारांसाठी बोली दिनांक ही बोली/इश्यू खुला होण्याआधी एक दिवस म्हणजे दिनांक 18 सप्टेंबर 2020 यानुसार राहील.हा इश्यू बुक बिल्डींग प्रक्रियेद्वारे सिक्यूरीटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिसक्लोजर रिक्वायरमेंट्स) 2018 ची तरतूद 6(1) अन्वये सुधारीत करण्यात आली असून क्यूआयबी इश्यू आकाराच्या 50% हून अधिक नसावे, अ-संस्थात्मक खरेदीदार हे इश्यू आकाराहून 15% पेक्षा कमीचे नसतील तसेच वैयक्तिक बोली विक्रेते इश्यू आकाराहून 35% कमीचे नसावेत.
वित्तीय वर्ष 2020 दरम्यान कंपनीची कामकाजातून होणारी उलाढाल Rs. 262.05 कोटी तर  बीआयटीडीए Rs.70.26 कोटी तसेच नफ्यानंतरचा कर Rs. 48.85 कोटी याप्रमाणे राहिला. आर्थिक वर्ष 18 आणि आर्थिक वर्ष 20 दरम्यान विक्रीत 29% सीएजीआर वृद्धी, ईबीआयटीएमध्ये 25% EBITA आणि पीएटी 36%. 31 मार्च 2020 रोजी कंपनीची एकूण उधारी Rs. 44.51 कोटी, तर डेट इक्विटी रेशिओ 0.31 याप्रमाणे होता.
सीएएमएसचा आयपीओ 21 सप्टेंबर रोजी खुला

chemcon
याशिवाय कंपनीचे प्रमुख ग्राहकांसोबत दीर्घकालीन नाते असून त्यात लौरस लॅब्ज लिमिटेड, हेटेरो लॅब्ज लिमिटेड, ऑरोबिंदो फार्मा लिमिटेड, मॅकलेओड्स फार्मास्युटीकल्स लिमिटेड, लॅनटेक फार्मास्युटीकल्स लिमिटेड, इंड-स्विफ्ट लॅबोरेटरीज लिमिटेड, वॉटर सिस्टीम्स स्पेशियलिटी केमिकल डीएमसीसी, सीसी ग्रान लिमिटेड, श्री राधा ओव्हरसीजसारख्या नावाजलेल्या कंपन्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे केमकॉन स्पेशियलिटी केमिकल्स लिमिटेड कंपनी स्वत:ची उत्पादने अमेरीका, जर्मनी, इटली, दक्षिण आफ्रिका, पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना, जपान, युनायटेड अरब एमिराटस्, सर्बिया, रशिया, स्पेन, थायलंड आणि मलेशियाला निर्यात करते. कंपनीच्या वतीने निर्मिती सुविधा केंद्राचा विस्तार करण्यासाठी ताज्या इश्यूतून जमा झालेला काही भाग वापरण्यात येईल. त्याचपद्धतीने खेळत्या भांडवलाच्या गरजा आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट कारणांकरिता विनियोग करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here