नवी दिल्ली :
चीनमधून (china) जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जग लॉकडाऊन केले आहे. जगभरात सुमारे पावणेदोन लाखाहून अधिक बळी कोरोनामुळे गेले आहेत. तर सगळ्यांच देशांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. आजवर चीन (china) हे जगातील सर्वांच्या पसंतीचे मॅन्युफॅक्चरिंग हब आहे. परंतु, त्यांचा कोरोनानंतरच्या जगामध्ये कदाचित हि परिस्थिती पूर्णतः बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण चीन मधून आपले मॅन्युफॅक्चरिंग प्लांट लवकरात लवकर हलवून ते भारतामध्ये आणण्यासाठी हजारभर कंपन्या उत्सुक आहेत. सुमारे १००० विदेशी कंपन्यांनी भारतीय अधिकाऱ्यांशी देशात कारखाना सुरु करण्याबाबत चर्चा सुरु केली आहे.
https://thebusinesstimes.in/china-economy-breaks-for-the-first-time-since-1992/
बिझनेस टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, मोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स, मेडिकल उपकरणे, वस्त्रोद्योग तसेच सिंथेटिक फॅब्रिक्स यातील किमान ३०० कंपन्या भारतात कारखाना सुरु करण्यासाठी सक्रियरित्या संपर्कात आहेत. तर दुसरीकडे अर्थतज्ज्ञ अरविंद पनगढिया यांनी म्हटले की, कोविड-१९ विषाणूच्या पार्श्वभूमीवर बहुराष्ट्रीय कंपन्या चीनमधून आपला गाशा गुंडाळून दुसऱ्या जागी जातील. त्याचा भारताने फायदा घेतला पाहिजे आणि औपचारिक क्षेत्रात चांगले वेतन देणाऱ्या नोकऱ्या तयार करण्यासाठी दीर्घकालीन विचाराने काम केले पाहिजे.
…म्हणून आहे म्युच्युअल फंड स्मार्ट गुंतवणूक
https://cinenama.in/2020/04/19/stx-entertainment-eros-international-merger/