आता 7 कोर्स जेवणासह बघा सिनेमा 

मुंबई:
छोटू महाराज (Chotu Maharaj) फूड अँड हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून के सरा सरा लिमिटेडने अन्नपदार्थ उद्योगात एक अनोखी संकल्पना घेऊन प्रवेश केला आहे. छोटू महाराज क्लाउड किचन ही ती संकल्पना आहे. के सरा सरा बॉक्स ऑफिस ही केएसएस लिमिटेडची फ्लॅगशिप कंपनी असून, या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने जगातील पहिली डोमच्या रचनेतील ‘सिने रेस्टोरंट अँड कॅफे’ ही संकल्पना ‘छोटू महाराज’ या ब्रॅण्डनेमखाली आणली आहे. याद्वारे नव्याने प्रदर्शित झालेल्या चित्रपटासोबत 7- कोर्स आणि 3- कोर्स जेवण सर्व्ह केले जाते. यामुळे चित्रपट बघण्याचा अनुभव एका वेगळ्या स्तरावर पोहोचतो.क्लाउड किचन ही कंपनीने आणलेली अत्यंत अनोखी संकल्पना आहे. यामुळे अनेकांना कोणत्याही गुंतवणुकीशिवाय उद्योजकतेची संधी मिळणार आहे. छोटू महाराज देऊ करत असलेले केलेले हे जोखीममुक्त व्यवसाय प्रारूप  फ्रँचायझींना अंशत: प्रक्रिया केलेल्या स्वरूपातील शुद्ध शाकाहारी अन्नपदार्थ पुरवणार आहे आणि या अन्नपदार्थांना पूर्णपणे तयार करून स्विगी व झोमॅटोसारख्या फूड डिलिव्हरी अॅप्सच्या माध्यमातून ऑर्डर करणा-या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी फ्रँचायझींवर आहे. फ्रँचायझीकडे केवळ किमान १५० चौरस फुटांचे स्वयंपाकघर असले पाहिजे. 
chotu maharaj
छोटू महाराज क्लाउड किचनचे वर्णन होम मेकर्सचे नवीन युगातील क्लाउड किचन असे केले जाऊ शकते. यात होम मेकर्स त्यांच्या घरातील स्वयंपाकघरातून किंवा व्यावसायिक आस्थापनातून भारतीय खाद्यपदार्थ सर्व्ह करणार आहेत. ग्राहकांना सर्व्ह केल्या जाणा-या पाककृतींचा विकास भारतातील आघाडीच्या केटरर्सच्या कौशल्याद्वारे करण्यात आला आहे. यांमध्ये देवेंद्र कोटेचा (बॉम्बे केटरिंग असोसिएशन आणि फेडरेशन ऑफ ऑल इंडिया केटरर्सचे सहसचिव), विपुल बदियानी (फेडरेशन ऑफ ऑल इंडिया केटरर्सच्या महाराष्ट्रा विभागाचे अध्यक्ष व बॉम्बे केटरिंग असोसिएशनचे समिती सदस्य) आणि क्लाउड किचनच्या व्यवसायाचा ५ वर्षांहून अधिक अनुभव असलेले भाविक बदियानी यांचा समावेश आहे.
कंपनीने मुंबईत केवळ १०८ आउटलेट्सचे नियोजन केले आहे. पहिल्या फेरीत ५०००हून अधिक अर्ज प्राप्त झाले. या अर्जांची खोलवर छाननी केल्यानंतर ३० अर्जांना फ्रँचायझी आउटलेट्स मंजूर करण्यात आली आणि त्यांच्याशी करार करण्यात आला. या फ्रँचायझी मुंबईत २५ ऑक्टोबर २०२०पासून अन्नपदार्थ सर्व्ह करण्यास सुरुवात करतील. झोमॅटो व स्विगी यांच्याशी अॅग्रीगेटर्स म्हणून भागीदारी करण्याशिवाय कंपनी लवकरच स्वत:चे फूड ऑर्डरिंग अॅप छोटू महाराज सुरू करणार आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिक कस्टमाइझ करता येण्याजोगा अनुभव देणे सोपे होईल. फ्रँचायझींची संख्या वाढवून भारतातील ७० शहरांमध्ये विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे. शहरांच्या लोकसंख्येनुसार फ्रँचायझींची संख्या ठरवण्यात येईल.
के सरा सराचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्लाइड मोंटेरो या अनोख्या सेवेबद्दल म्हणाले, “पारंपरिक संकल्पना आधुनिक मार्गाने सर्वांसमोर आणण्याची परंपरा कायम राखल्याचा आम्हाला आनंद आहे. यामुळे भारताची चव पिढ्यानुपिढ्या जिवंत राहील आणि सध्याच्या संकटाच्या काळात अनेकांना उद्योजकतेची अनोखी संधीही मिळेल.” कंपनीच्या मते, फ्रँजायझी मिळवण्यासाठी असलेल्या मूलभूत अटी पूर्ण करणा-या कोणत्याही व्यक्ती किंवा कुटुंबाला उद्योजक होता येईल आणि दर महिन्याला किमान ६०,००० रुपये ते ३ लाख रुपये कमावणे शक्य होईल. याबाबत के सरा सराचे अध्यक्ष सतिश पंचारिया म्हणाले, “आम्ही एका अनोख्या संकल्पनेसह प्रथम छोटू महाराज लाँच केले, तेव्हा आमची अपेक्षा देशभरातील हजारो लोकांसाठी रोजगार निर्माण होईल अशी होती. छोटू महाराज क्लाउड किचन ही अपेक्षा आणखी पुढे घेऊन जाईल आणि देशभरात हजारो उद्योजकांचा विकास करेल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here