गरीब मजुरांवर कोरोनाची कुर्‍हाड?

corona lock down laborers dubai
  • अस्लम जमादार

वांद्रेच्या घटनेमुळे केवळ परप्रांतियच नव्हे तर जगभरातील लाखों मजुरांचा प्रश्न ऐरणीवर उभा आहे, सर्वांची एकच विनवणी, आम्हाला अन्न-निवारा नको फक्त आमच्या घरी आम्हाला सुखरूप जाऊ द्या.

सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच अनिवासी भारतीयांना स्वगृही येण्याच्या ठरावावर सांसर्गिक (corona) कोरोनाचा वाढता दुष्परिणाम शक्यता व्यक्त करत पुढील 4 आठवडे भारतात आणण्याचे विचाराधीन नसल्याचे स्पष्ट केले आहे. आज जगातील सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द आहेत, त्यामुळे जगभरात अडकलेले हजारो प्रवासी, पर्यटक, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच अनिवासी भारतीयांना तूर्त स्वगृही परतणे असंभव आहे.
रविवारी दुबई (UAE) प्रशासनाने विमानतळावर अडकलेले व इच्छुकांना आपल्या स्वदेशी जाण्यासाठी पुढाकार घेऊन लॉकडाउन (lockdown) संपताक्षणीच परत पाठवण्याच्या हालचालींना वेग आणला होता पण तो तूर्त फोल ठरला आहे, तो लॉकडाउनची (Lockdown) मर्यादा 3 मे पर्यंत वाढविल्यामुळेच. यूएईचे भारतातील राजदूत अहमद अब्दुल रहमान अल बना ह्यांनी ह्या संदर्भात सर्व सहाय्य भारताला करण्याचे आश्वासन दिले आहे. त्या अनुषंगाने परतीच्या सर्व प्रवासांची कोरोनाच्या (Corona) चाचणीला 100 टक्के सामोरे जावे लागेल. निगेटिव्ह प्रवाशांना तत्काळ भारतात पाठविले जाईल, तर यदाकदाचित जर कोणी पॉझिटिव्ह आढळले तर त्यांचे विलगीकरण करून सर्व वैद्यकीय सेवा पुरवल्या जातील. यावेळी असेही स्पष्ट करण्यात आले आहे की आजपावेतो 5 लाखावरून अधिक चाचण्या (Corona) कोरोनासाठी पार केल्या आहेत तसेच यूएई वैद्यकीय सेवा ही जागतिक दर्जाची असून सर्व सुविधा उपलब्ध आहेत .
corona lockdown laborers dubai

85 टक्के अनिवासी भारतीय मजदूर आणि कामगार  :

आज यूएई मध्ये 30 लाखावरून अधिक भारतीय आहेत हे प्रमाण त्या देशाच्या ही 30 % हून अधिक आहे हे विशेष. ह्या भारतीयांमध्ये केरळ सर्वाधिक त्यानंतर
तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश ह्या राज्यातील दिसून येतात. केरळ मुस्लीम कल्चरल सेंटर ह्यांनी 85 % पेक्षा अधिक अनिवासी भारतीय हे मजूर आणी कंत्राटी पद्धतीचे असल्याने त्यांचा येथील पोटाचा गंभीर प्रश्न भेडसावत असल्याचे स्पष्ट करत त्यांच्या परतीसाठी याचिका केरळ हायकोर्ट मध्ये सादर केली होती. त्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाचा आजचा निर्णय महत्वपूर्ण ठरला आहे.
आज आखाती देशाबरोबर इतर देशातील अनिवासी भारतीय, पर्यटक यांना असेच सामोरे जावे लागणार आहे. जगभरामध्ये अनिवासी भारतीय तब्बल एक कोटी 75 लाख आहेत. ज्या देशामध्ये (corona) कोरोनाचा मोठा प्रभाव आहे, अशा पहिल्या 10 देशामधील अनिवासी भारतीय 20 लाखाहून अधिक आहेत. लॉकडाउन घोषित होण्याआधी 90 हजाराहून अधिक अनिवासी, पंजाबमध्ये परतले. त्यांना आलेला अनुभव मोठा विचार करावयास भाग पाडणारा आहे. स्थानिक रहिवाशी तर सोडाच परंतु जवळचे नातेवाईक, आप्तेष्ट ह्यांनीही त्यांना नाकारले. यावरून अनिवासी यांना भारतात परतल्यावर किती मोठ्या मानसिकतेला सामोरे जावे लागणार आहे हे स्पष्ट होते.

एकेकाळी नात्यातील व्यक्ती ही परदेशी म्हणजे अभिमानास्पद अशी बाब होती आता हीच बाब नाते लपवण्यापर्यंत जाऊन ठेपली आहे. मार्च महिन्यात इटलीचा सहलीचा प्रवास करून आलेले 48 वर्षीय विपिन कुमार ह्यांचा मृत्यू खरेतर हृदयविकारामुळे झाला पण इटलीहून आल्यामुळे त्यांचे अंतिम दर्शन घेण्यास कोणी आले नाही.मार्च महिन्यातील रोम शहरातील ही घटना, भारतातील यमुनानगर, बिलासपूर हे मूळ गाव असलेले अनिवासी भारतीयाचे निधन कोरोनामुळे झाले ही दु:खद वार्ता जेव्हा भारतातील घरच्यांना कळविण्यात आली तेव्हा मृतदेह भारतात न पाठविता तेथेच अंत्यसंस्कार करण्याची अनुमती तर दिलीच मात्र इथे कुठेही नातेवाईक, शेजारी बिलकूल वाच्यता करण्यात आली नाही. या घटनाच कोरोनामुळे आपलीच माणसे, आपलेच नातेवाईक, आपलाच समाज कशी मानसिकता सरड्याप्रमाणे रंग बदलतो आहे हे दाखवून देत आहे.
corona lockdown laborers dubai

https://thebusinesstimes.in/what-is-the-helicopter-money/

​’​त्यांना​’ समजून कोण घेणार?​ :

आज जगभरातील अनिवासीयांच्या 6% हून अधिक प्रमाण भारतीयांचे आहे हे विशेष. बहुतांशी हे पैसा, संपत्ती कमविण्याच्या उद्देशानेच स्थलांतरित झाले. परंतु (corona) कोरोनाच्या या उदाहरणाने इटली, अमेरिका सारखी प्रगत देशसुद्धा देशोधडीला लागले. पैसा सर्वस्व नाही हे इटलीच्या जनतेने रस्त्यावर कचर्‍याप्रमाणे पैसा फेकून आपल्या भावना व्यक्त केल्या यावरून बरेच काही शिकण्यासारखे आहे. पोटासाठी जवळ पैसा असूनही हजारो अमेरिकन्स आपल्या वाहनासह कित्येक किलोमीटर रांगा आज लावत आहेत. तर या उलट चित्र भारतात प्रशासन, पोलीस खाते, सेवाभावी संघटना गरीब, गरजूंकडे चालून येत आहेत ते त्याच्या पोटाची भूक भागवण्यासाठी.
आज प्रामुख्याने अनिवासी भारतीय मजूर द्विधा मनोवस्थेत आहे 25 लाखाहून अधिक हे कंत्राटी पद्धतीचे आहेत. त्यांच्या पालन पोषणची जबाबदारी घेण्यास कोणीही पुढे सरसावत नाही. या परिस्थितीत सध्या सुधारणा होणे अशक्य आहे, म्हणून ते परतीच्या मार्गावर आहेत, परंतू त्यांची ही विवंचना कोण समजून घेणार? तिथे राहत येत नाही, अन्न नाही, रोजगार नाही, आपली माणसे नाहीत आणि इकडे भारतात येता येत नाही. थोडक्यात आई जेवू घालिना आणि बाप भीक मागू देईना, अशी दयनीय अवस्था.
आजमितीला फक्त 10% अनिवासी भारतीयांनी परत येण्याचे ठरवले तरी ही संख्या तब्बल 20 लाखाच्या आसपास जाते. परंतु त्यांच्या या कृतीला आपला समाज किती सहानुभूती दाखविणार? हा ही तेवढाच गंभीरतेचा प्रश्न आहे. कारण मरकजच्या घटनेवरून परदेशातून येणार्‍यांसाठी पुन्हा ​कोरोना (Corona) चाचणी, विलगीकरण हे अनुभवतोय. या बाबींना कसे सामोरे जायचे हादेखील तेवढाच प्रश्न प्रशासनासमोर असणार आहे. यात मात्र अनिवासी भारतीय गरीब मजूर पीडितांना मात्र देवावरच विसंबून राहावे लागते की काय? अशीच परिस्थिती सध्या दिसते आहे.
corona lockdown laborers dubai

(लेखक सामाजिक कार्यकर्ते, अभियंते आणि रांजणगाव (पुणे) एमआयडीसी येथे सरव्यवस्थापक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here