पणजी :
जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, गोव्याने मात्र कोरोनापाशातून सहीसलामत सुटका करून घेतली आहे. त्यामुळे आता देशभरात विविध ठिकाणी शिक्षणासाठी किंवा सहलीसाठी गेलेल्या आणि आता लॉकडाऊनमुले अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना (Students) राज्यसरकारने गोव्यात परत आणावे, त्यासाठी केंद्रसरकारडे बोलून कृती योजना तयार करावी अशी आग्रही मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे.
शनिवारी मुख्यमंत्री सावंत यांनी असे म्हटले होते की, देशात ठिकठिकाणी अडकलेल्या विद्यार्थ्यांनी (students) जिल्हाधिका-यांची परवानगी घेऊन गोव्यात येता येईल. परंतु येथे आल्यानंतर त्यांना १४ दिवस क्वारंटाइन रहावे लागेल. यावर कामत यांनी मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे म्हटले आहे. गेले ४३ दिवस गोव्यातील विद्यार्थी परराज्यात अडकून पडलेले आहेत.
गोव्यात 3 मे नंतरही लॉकडाऊन वाढणार
नवोदयचे १३ Students दिल्लीत अडकले
दरम्यान, वाळपईच्या नवोदय विद्यालयाचे १३ विद्यार्थी दिल्लीत अडकले आहेत. तर विद्यार्थी देवणा घेवाण उपक्रमांतर्गत गोव्यात आलेले मंगेशपूर, दिल्लीच्या नवोदय विद्यालयाचे इयत्ता नऊवीचे १८ विद्यार्थी येथे अडकले आहेत. पुणे येथे उच्च शिक्षणासाठी गोव्यातील शेकडो विद्यार्थी आहेत. २२ मार्चच्या देशव्यापी कर्फ्युनंतर लगेच लॉकडाउन जाहीर झाल्याने या विद्यार्थ्यांना गोव्यात येता आले नाही. देशाच्या अन्य भागांमध्येही गोमंतकीय विद्यार्थी अडकलेले आहेत आणि ते मदतीची अपेक्षा करीत आहेत.
https://twitter.com/digambarkamat/status/1254404320772186112
ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज.