मुंबई :
सायकल प्युअर अगरबत्तीजचे निर्माते एन. रंगराव अँड सन्स यांनी कोरोना सोबत लढण्यासाठी ‘हीलिंग टच’ हे सॅनिटायझर्स बाजारात आणले आहे. गेल्या काही दिवसांत बाजारपेठेत सॅनिटायझर्सची अचानक वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी संस्थेने आपल्या सुगंधी उत्पादनांच्या मालिकेच्या जागी ही सॅनिटायझर्स बाजारात आणली आहेत. क जीवनसत्वाने समृद्ध अशा लिंबाच्या गुणधर्मांवर आधारलेला हा सॅनिटायझर नागरिकांना स्वच्छता आणि सुरक्षिततेची हमी देण्याच्या हेतूने खास तयार करण्यात आला आहे.
हवामानाने मारले, तरी ‘रिलायन्स’ तारणार
ग्राहकांची बदलती जीवनशैली आणि आरोग्याप्रती त्यांची वाढती जागरुकता यामुळे सॅनिटायझर्स ही आजच्या काळातील अत्यावश्यक वस्तू बनली आहे. ’हीलिंग टच’मध्ये ७०% अल्कोहोल व अँटिसेप्टिक घटक असून हे उत्पादन क जीवनसत्वाने समृद्ध आहे. हे सॅनिटायझर बाजारात जेल आणि स्प्रे अशा दोन प्रकारांत उपलब्ध असेल व ५० मिली आणि १०० मिली अशा दोन आकाराच्या बॉटल्समध्ये मिळू शकेल. या उत्पादनाच्या अनावरणाप्रसंगी एन. रंगराव अँड सन्सचे मॅनेजिंग पार्टनर किरण रंगा म्हणाले, ‘आरोग्याच्या क्षेत्रामध्ये स्वच्छतेला सर्वाधिक महत्त्व दिले जाते व त्यानुसार आमची सॅनिटायझर्स सुरक्षित असून ही सुरक्षिततेच्या मानकांबरहुकुम तयार करण्यात आली आहेत. हँड सॅनिटायझर्स बनविणे ही आमच्या आवाक्यातील गोष्ट होती व योग्य वेळी हे उत्पादन बाजारपेठेत आणत असल्याचा आम्हाला आनंद आहे.’
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक करा…