‘सायकल’ अगरबत्तीजकडून पीएम केअर्स फंडाला एक कोटी

cycle brand agarbatties

मुंबई :
अगरबत्ती ते ऐरोस्‍पेस समूह एनआर ग्रुपच्‍या सायकल प्‍युअर अगरबत्तीजने देश व सरकारला कोविड-१९ विरोधातील लढ्यामध्‍ये पाठिंबा म्‍हणून पीएम केअर्स फंडामध्‍ये  एक कोटी आठ लाख रुपयांची मदत दिली आहे. त्याचप्रमाणे कंपनीच्यावतीने नोव्‍हल कोरोना व्‍हायरसवर मात करण्‍यासाठी त्‍यांच्‍या कर्मचाऱ्याना व्‍यवसाय सुरू ठेवण्‍यासाठी आश्वस्त केले आहे. देशव्‍यापी लॉकडाऊनदरम्‍यान आपल्‍या कर्मचाऱ्याना सक्रियपणे पाठिंबा देत म्‍हैसूरस्थित कंपनीने स्‍थलांतरित मजूर, ड्युटीवर असलेले पोलिस आणि बेघर लोकांना भोजनाची सुविधा देण्‍यासाठी त्‍यांच्‍या होमटाऊनमधील विविध स्‍वयंसेवी समूहांना एक लाख रूपये दिले आहेत. 
या जागतिक संकटादरम्‍यान कंपनीने रंगसन्‍स टेक्‍नोलॉजीजद्वारे स्‍थापित आंतरराष्‍ट्रीय संबंधांच्‍या माध्‍यमातून म्‍हैसूर सरकारला ५ वेंटीलेटर्स देखील दिले आहेत. तसेच कंपनीने पीपीई किट्सची सुविधा देण्‍यासह संरक्षणात्‍मक मास्कचे वाटपदेखील केले आहेत. कंपनीने देशभरातील त्‍यांच्‍या  कर्मचाऱ्याना  या आव्‍हानात्‍मक स्थितीमध्‍ये सरकारला पाठिंबा देत त्‍यांच्‍यापरीने मदतीचा हात पुढे करण्‍याचे आवाहन देखील केले आहे. सद्यस्थितीबाबत बोलताना सायकल प्‍युअर अगरबत्तीजचे व्‍यवस्‍थापकीय संचालक अर्जुन रंगा म्‍हणाले, ”देशभरातील आपल्‍या सर्वांसाठी हा आव्‍हानात्‍मक काळ आहे. म्‍हणूनच या लढ्यामध्‍ये आपल्‍या सरकारला पाठिंबा देत मदतीचा हात पुढे करणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. एक कंपनी व व्‍यक्‍ती म्‍हणून आम्‍ही या महामारीवर मात करण्‍यासाठी आमच्‍यापरीने सर्वतोपरी कार्य करत आहोत. देशभरातील आमचे कर्मचारी संबंधित राज्‍यामधील कोविड-१९ रिलीफ फंड्समध्‍ये देखील दान करत आहेत. आम्‍ही देशभरातील नागरिकांना त्‍यांच्‍यापरीने कामगिरी करण्‍याचे आणि सरकारच्‍या सूचनांचे गांभीर्याने पालन करण्‍याचे आवाहन करतो. हात स्‍वच्‍छ धुणे, स्‍वच्‍छता राखणे, सोशल डिस्‍टन्सिंग राखणे यांसारख्‍या सोप्‍या कृती सध्‍या आवश्‍यक आहेत.”
ते पुढे म्‍हणाले, ”हीच वेळ आहे, जेथे आपण अंतर्मनातून विचार करत आपल्‍या स्‍वत:मध्‍ये सुधारणा केली पाहिजे. म्‍हणूनच आम्‍ही हे लॉकडाऊन यशस्‍वी करण्‍यासाठी छंद जोपासत वेळ सत्‍कारणी वापरण्‍याचे आवाहन करतो. तसेच आम्‍ही सर्वांना या लढ्यामध्‍ये अग्रस्‍थानी असलेले आपले आरोग्‍य कर्मचारी व पोलिसदलाच्‍या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करण्‍याची विनंती करतो. या लढ्यामध्‍ये आपण सर्व एक आहोत आणि लोकांचा पाठिंबा व आशीर्वादासह आपण या लढ्यावर मात करत यशस्‍वी ठरू.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here