साइंटने पटकावला बोईंग परफॉरमन्स एक्सलन्स पुरस्कार

Cyient

मुंबई :
साइंट (Cyient) या जागतिक अभियांत्रिकी व तंत्रज्ञान सोल्यूशन कंपनीला2019 चा बोईंग परफॉरमन्स एक्सलन्स अवॉर्ड मिळाला आहे. बोईंग कंपनी उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पुरवठादार कंपन्यांना दरवर्षी पुरस्कार देते. साइंटने प्रत्येक महिन्यासाठी सिल्वर कम्पोजिट प्रदर्शन रेटिंग कायम ठेवली आहे. याचा कार्यकाळ ऑक्टोबर 2018 ते सप्टेंबर 2019 पर्यंत 12 महिने असतो.
शेअर बाजाराने गाठला सहा महिन्यातील उच्चांक
Cyient
या यशाबद्दल भाष्य करताना आनंद परमेस्वरन, वरिष्ठ उपाध्यक्ष, एरोस्पेस आणि संरक्षण – साइंट म्हणाले कि, “बोइंग कडून रौप्य स्तरीय परफॉरमन्स एक्सलन्स पुरस्कार मिळाल्याबद्दल साइंटला अभिमान आहे. आम्ही साइंट आणि बोइंग यांच्यातील दीर्घकाळच्या संबंधांचे मनापासून कौतुक करतो, तसेच हा पुरस्कार आमच्या अभियंत्यांच्या परिश्रमाचा परिणाम आहे. आम्ही इनोव्हेशनच्या आधारे आमच्या ग्राहकांना अधिक कार्यक्षमता प्रदान करण्यासाठी नवीन मार्ग विकसित करण्यास उत्सुक आहोत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here