‘दावत’ भरवतेय भुकेल्यांना घास

davat

मुंबई :
कोविड महामारीशी लढण्यासाठी सुरू असलेल्या मदतीच्या प्रयत्नांच्या समर्थनार्थ, जागतिक खाद्य कंपनी एलटी फूड्स लिमिटेडच्या दावत बासमती तांदळाच्या दावत सेहत या नवीन श्रेणीने फीड माय सिटी सह भागीदारी केली आहे. एक उपक्रम जो दैनंदिन मजुरी, स्थलांतरित कामगार, बेघर आणि गरजू अशा कुटुंबांना जेवण पुरवत आहेत.
हा उपक्रम २८ मार्चपासून बेंगळुरूमध्ये सुरू करण्यात आला असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने हैदराबाद, मुंबई, चेन्नई आणि नोएडा इथे करण्यात आला. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून या शहरांमधील वंचित सदस्यांना नियुक्त केलेल्या ठिकाणी पोषक आहार देण्यात येत आहे. फीड माय सिटी दररोज १ लाखांपेक्षाही अधिक लोकांना पौष्टिक जेवण देत आहे.
देशात चौथे लॉकडाऊन सुरु…

या उदात्त उपक्रमावर भाष्य करताना, एलटी फूड्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अश्वनी अरोरा म्हणाले,“कोविड -१९ महामारी मानवतेवरदूरगामी परिणाम करत आहे आणि कोट्यावधी लोकांना गंभीर आर्थिक ताणतणावात आणले आहे. या कठीण काळात संघटना आणि लोकांनी एकत्र येऊन हे संकट कमी करण्यासाठी प्रयत्न करणे महत्वाचे आहे. दावत एक ब्रँड म्हणून समुदायांचे पालनपोषण आणि आजूबाजूच्या जीवनशैली सुधारण्याच्या मूल्यांवर आधारित आहे. आमचा सध्याचा फीड माय सिटी सोबतचा उपक्रम या साथीच्या आजारामुळे आधीच व्यथित आणि विस्थापित झालेल्यांसाठी खाण्यासारख्या मूलभूत गरजा पोहोचविणे सुनिश्चित करण्यासाठी आमचे छोटंसं योगदान आहे.”
ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here