नवी दिल्ली :
’सफोला’हनीमध्ये आढळलेल्या साखरेच्या पाकामुळे ‘डाबर’ने (Dabur) सफोलाची निर्मिती कंपनी ‘मेरिको’विरोधात एएससीआयमध्ये तक्रार दाखल केली आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या विविध मधांचे नुकत्याच झालेल्या एनएमआर तपासणीमध्ये ‘सफोला हनी’मध्ये साखरेचा पाक आढळला. हा प्रकार ग्राहकांची दिशाभूल करणारा असल्याचे डाबरने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (एफएसएसएआय) यांनी नुकतेच स्पष्ट केले की, त्यांच्या 22 अनिवार्य चाचण्यांसह एसएमआरसारख्या विशिष्ट चाचणीसह सर्व संभाव्य भेसळ करणारी आणि मधातील साखर शोधण्यासाठी जागतिक स्तरावर सर्वात कठोर चाचण्या आहेत.
एसएमआरसह वरील सर्व एफएसएसएएआय-अनिवार्य चाचण्यांमध्ये ’डाबर’ यशस्वी ठरला आहे. त्याचसोबत आपल्या ग्राहकांना नेहमीच कोणत्याही प्रकारची भेसळ नसलेला 100 टक्के शुध्द मध ’डाबर’ देत आहे, त्यासाठी वेळोवेळी स्वेच्छेने आपल्या उत्पादनांची एनएमआर चाचणी घेण्यात येते. म्हणूनच डाबर हनी हा जगातील सर्वाधिक विक्री होणारा मध ब्रांड आहे. ’डाबर हनी’ भारतासोबतच युरोपियन आणि अमेरिकेतील सर्व नियमांच्या सर्व निकषांवर खरा उतरत असल्यानेच जगातील 15 पेक्षा जास्त देशांमध्ये मध निर्यात करत असल्याचे डाबरच्यावतीने सांगण्यात आले.