जीएसआयच्या महासंचालकपदी डॉ. रणजित रथ

dr. ranjith rath

मुंबई :
‘नॅशनल जिओसायन्‍सेस अवॉर्ड २०१६’ पुरस्‍कारप्राप्‍त आणि खाण मंत्रालयांतर्गत मिनी रत्‍न-१ सीपीएसई मिनरल एक्‍स्‍प्‍लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एमईसीएल) अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक, डॉ. रणजित रथ यांची १ मे २०२० पासून भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे महासंचालक म्‍हणून अतिरिक्‍तपदी नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. डॉ. रथ यांनी ३० एप्रिल २०२० रोजी निवृत्त झालेले एम. श्रीधर यांची जागा घेतली.
प्रॅक्टिशनर भूवैज्ञानिक डॉ. रणजित रथ हे आयआयटी मुंबई, आयआयटी खरगपूर, उत्‍कल युनिव्‍हर्सिटी, भुवनेश्‍वर व आयआयएफटी, नवी दिल्‍लीचे माजी विद्यार्थी आहेत. त्‍यांनी धोरण निर्माण, व्‍यवसाय विकास, तेल व वायू मालमत्ता व्‍यवस्‍थापनामध्‍ये वाढ यामध्‍ये विविध भूमिका पार पाडल्‍या आहेत. तसेच त्‍यांनी ऊर्जा सुरक्षिततेप्रती एक हस्‍तक्षेप असलेला क्रूड तेलाच्‍या धोरणात्‍मक साठ्यासाठी खाणकामाचा समावेश असलेला पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय, भारत सरकारचा अनोखा उपक्रम ‘स्‍ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्‍ह्स (एसपीआर)’च्‍या निर्मितीसारख्‍या विविध महत्त्वपूर्ण प्रकल्‍पांमध्‍ये भूविज्ञान व अन्‍वेषण भूविज्ञानाचे उपयोजन करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्‍यांनी ‘अंडरग्राऊण्‍ड स्‍टोरेज टेक्‍नोलॉजीज’वर महत्त्वपूर्ण पुस्‍तकाचे सह-लेखन केले आहे आणि विविध तंत्रज्ञान पेपर्स प्रकाशित करण्‍यासोबत भारत व परदेशांमधील परिषदेमध्‍ये सहभाग घेतला आहे.

भूविज्ञानामध्‍ये २४ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव व कौशल्‍यासह त्‍यांचा कॉर्पोरेट अनुभव त्‍यांना जीएसआयचे महासंचालक म्‍हणून त्‍यांच्‍या जबाबदा-या पूर्ण करण्‍यामध्‍ये साह्य करेल. असा अंदाज आहे की, जीएसआय अधिक विकसित होण्‍यासह नव्‍या उंचीवर पोहोचेल आणि देशातील भूविज्ञान व खाण विभागांसाठी केंद्र व राज्‍य सरकार, उद्योगक्षेत्र व शैक्षणिक संस्‍थांदरम्‍यान एकसंधी समन्‍वय साधण्‍यामध्‍ये साह्य करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here