लॉकडाउनमध्येही मिळणार ‘​गोदरेज’​ प्रॉडक्ट्स घरपोच​

during-lockdown-you-can-get-godrej-products-by-home-delivery

मुंबई : कोरोना विषाणूचे संक्रमण नियंत्रित करण्यासाठी सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये ग्राहक, रिटेलर व वितरक यांना सेवा देण्यासाठी गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडच्यावतीनेतीन महत्त्वाच्या भागीदारींची घोषणा केली आहे. जीवनावश्यक वस्तूंची डिलेव्हरी देण्याच्या हेतूने, या तीन भागीदारी फूड डिलेव्हरी अॅप झोमॅटो; B2B पुरवठा साखळी स्टार्टअप शॉप किराणा व कार रेंटल कंपनी झूमकार यांच्याशी करण्यात आल्या आहेत.
झोमॅटो जीसीपीएल उत्पादने थेट ग्राहकांना व घरोघरी पोहोचवणार आहे, शॉप किराणा वैयक्तिक रिटेलरना थेट जीसीपीएलशी जोडून त्यांना या वस्तू उपलब्ध करणार आहे. झूमकार विविध जीवनावश्यत वस्तू वितरकांना वेळेत पोहोचवणार आहे. जीसीपीएलचा होम डिलेव्हरी उपक्रम झोमॅटोच्या ‘झोमॅटो मार्केट’ या नव्या नव्या अॅप वैशिष्ट्यांतर्गत नोंदवला जाणार आहे. लोकांनी घरातच राहावे आणि त्यांना घरबसल्या जीवनावश्यक वस्तूंची ऑर्डर देता यावी, हा घरपोच सेवा देण्यामागचा जीसीपीएलचा हेतू आहे. ग्राहकांना पर्सनल केअर, हेअर केअर, होम केअर व हाउसहोल्ड इंसेक्टिसाइज या श्रेणींतील जीसीपीएलची उत्पादने उपलब्ध केली जातील. 
Godrej consumer products
कंपनीच्या विविध ब्रँडमधून ग्राहकांना पुढील उत्पादने थेट घरपोच मिळतील – गोदरेज नं.1, गोदरेज फेअर ग्लो व सिंथॉल हे साबणाचे प्रकार, गोदरेज एक्स्पर्ट, गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीम, गोदरेज नुपूर हिना, गुडनाइट (विविध प्रकारांसह), गोदरेज हिट व गोदरेज एअर (एअर मॅटिक, एअर पॉकेट, एअर क्लिक व एअर होम स्प्रे). ही सेवा सध्या आग्रा येथे दिली जात हे आणि लवकरच अन्य शहरांमध्ये सुरू केली जाणार आहे.. जीसीपीएलने दुसरी भागीदारी शॉप किराणा या इंदोरमधील B2B पुरवठा साखळीशी केला असून, त्याद्वारे वैयक्तिक रिटेलरना गोदरेज नं.1 साबणाचा थेट पुरवठा केला जाणार आहे. शॉप किराणा वैयक्तिक रिटेलरना थेट पुरवठादारांशी जोडते. त्यांना जीवनावश्यक वस्तूंची (केवळ धान्य व साबण) ऑनलाइन ऑर्डर घेणे व या वस्तू पोहोचवणे यासाठी मध्य प्रदेश सरकारकडून परवाना मिळाला आहे. या वस्तू पोहोचत्या करण्यासाठी शॉप किराणाने ‘जरूरी’ हे नवे अॅप सादर केले आहे.पारंपरिक वाहतूक जाळ्यावरील अवलंबित्व कमी करणे आणि पुरवठा साखळी सुरू ठेवण्यासाठी झूमकारच्या ताफ्याचा वापर करणे, हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. सध्या, हा उपक्रम मुंबई व नागपूर येथे सक्रिय करण्यात आला आहे. तो पुण्यासारख्या शहरांत, तसेच मध्य प्रदेश व गुजरात या राज्यांतही राबवला जाणार आहे.
गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे (जीसीपीएल) भारत व सार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कटारिया यांनी या उपक्रमाविषयी बोलताना नमूद केले,“सध्या निर्माण झालेल्या संकटाचा सामना करण्यासाठी योगदान देण्याच्या हेतूने आणि लोकांना मदत करण्याच्या हेतूने आम्ही हे तीन विशेष सहयोग केले आहेत. लोकांनी घरी राहावे आणि त्यांना घरी कोणत्याही अत्यावश्यक वस्तूंची कमतरता भासू नये, यासाठी आम्ही झोमॅटोच्या मदतीने थेट होम डिलेव्हरी देणार आहोत. याचबरोबर, झूमकार व शॉप किराणा यांच्याबरोबरच्या आमच्या भागीदारीद्वारे वितरक व रिटेलर यांना जीवनावश्यक उत्पादनांचा अखंडित पुरवठा केला जाणार असल्याने ही उत्पादने बाजारात उपलब्ध असणार आहेत. जीसीपीएलमध्ये आम्ही ग्राहक, वितरक व रिटेलर यांना पाठिंबा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. सध्याच्या आव्हानात्मक काळामध्ये आपली क्षमता वाढवण्यासाठी असे सहयोग अतिशय उपयुक्त ठरणार आहेत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here