मुंबई :
स्टेप ॲपला आदिवासी विकास मंत्रालयातर्फे भारतातील सर्व आदिवासी शाळांमध्ये त्यांच्या गेमिफाइड लर्निंग ॲपची अमलबजावणी करण्याची परवानगी मिळाल्याने विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. या कराराच्या निमित्ताने पहिल्यांदाच शासनाने निधीचा समावेश असलेल्या एखाद्या प्रकल्पासाठी भारतीय एडटेक स्टार्टअपसह सहकार्य केले आहे.या उपक्रमामुळे देशातील पहिली ते बारावीच्या 1.5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना लगेचच लाभ मिळणार आहेत आणि येत्या काही वर्षांत या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यात येईल. या सहकार्याच्या माध्यमातून स्टेपॲप विद्यार्थ्यांची शालेय परीक्षा तसेच स्पर्धात्मक परीक्षांमधील कामगिरी उंचावेल. शिवाय, डॅशबोर्डच्या माध्यमातून शाळांना मुलांची शैक्षणिक प्रगतीही मोजता येईल. हा कंटेंट इंग्रजी भाषेतून पुरवला जाणार आहे.
गणित आणि विज्ञानातील संकल्पना गेमिफाइड स्वरुपात समजावून घेत विद्यार्थ्यांना हसतखेळत, आनंद घेत शिकता यावे यादृष्टीने स्टेपॲप या गेमिफाइल लर्निंग सोल्युशनवर सेवा पुरवली जाते. यात सहजसोपी परीक्षा पद्धती, शैक्षणिक परिणाम मोजण्याची सोय, सेल्फ-पेस्ड लर्निंग, 400 हून अधिक आयआयटीअन्स आणि डॉक्टरांनी तयार केलेला कंटेंट तसेच सन्मान आणि बक्षिसे अशी विविध वैशिष्ट्ये यात आहेत.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वप्नांना वेग देण्याचे साधन बनणे आणि भारतातील प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षणासाठी वैश्विक उपलब्धता मिळवून देणे हा स्टेपॲपचा उद्देश आहे. यातून प्रतिभावान मुलांची मोठी फौज उभी करून देशासाठी मनुष्यबळाची संपत्ती निर्माण केली जात आहे. ॲपस्टेपने 31 ऑगस्ट 2020 पर्यंत 21 राज्यांमधील (गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, नागालँड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, आंध्र प्रदेश, केरळ, उत्तराखंड, मणिपूर, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, सिक्किम, हिमाचल प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, मिझोराम आणि कर्नाटक) 242 शाळांमधील 35,167 नोंदणीकृत विद्यार्थ्यांना ही सोय उपब्लध करून दिली आहे.
‘रूट’चा आयपीओ होणार 9 पासून खुला
एड्यूइजफन टेक्नॉलॉजिज (स्टेपॲप)चे संस्थापक आणि पेस-आयआयटीचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण त्यागी म्हणाले, “भारत सरकार आणि आदिवासी शिक्षण विभागाचा हा फारच चांगला उपक्रम आहे. या संकटकाळात शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व द्यायला हवे आणि त्यादृष्टीने योग्य पाऊल उचलण्यात आले आहे. या आदिवासी मुलांना ऑनलाइन शिक्षणाचे पर्याय देण्यासाठी आम्ही ईएमआरएस शाळा आणि शिक्षकांना सक्षम करत आहोत आणि या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळवून देण्याच्या आमच्या समान ध्येयाप्रति कार्यरत आहोत, याचा मला अत्यंत आनंद वाटतो. या अत्यंत कठीण काळात राष्ट्रउभारणीच्या कार्यात सहभागी होऊ शकल्याचा मला अभिमान वाटतो.”
आदिवासी विकास मंत्रालयांच्यावतीने सांगण्यात आले कि, “विद्यार्थ्यांना विविध संकल्पना मजेशीर पद्धतीने शिकता याव्यात यासाठी गणित आणि विज्ञानाच्या संकल्पना गेमिफाइड पद्धतीने उपलब्ध करून देणारे एक अत्यंत उपयुक्त साधन म्हणजे स्टेपॲप. मंत्रालयाच्या बाजूनेही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो आणि याचाच एक भाग म्हणजे स्टेपॲप. या माध्यमातून मिळणारे शिक्षण विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.”