तेल खा, इम्युनिटी वाढवा…

मुंबई :
सध्याच्या अनारोगी वातावरणात सगळेचजण मनुष्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी विविध उत्पादने आणत असताना, आता इमामीने चक्क असे खाद्यतेल आणले आहे, जे रोजच्या स्वयंपाकात वापरल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढू शकेल असा कंपनीचा दावा आहे. भारतात खाद्यतेलामध्ये पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आला आहे.
ए, बी, सी, ई, डी आणि ओमेगा 3 अशा पाच प्रकारच्या वैज्ञानिकदृष्ट्या आवश्यक पोषक घटकांचा समावेश असलेला ईमामी हेल्दी ॲण्ड टेस्टी स्मार्ट बॅलन्स इम्युनिटी बूस्टर ऑईल हा भारतातील पहिला असा खाद्यतेल ब्रँड आहे ज्यात तुमची रोगप्रतिकारशक्ती आतून वाढवली जाते. आपल्या रोजच्या जेवणातून आरोग्याच्या धोक्यांशी लढण्याची ताकद यातून मिळते.
कोविड 19 विषाणूच्या या महासंकटामुळे मानवाला असे धोके, त्याची असुरक्षितता अभूतपूर्व पद्धतीने समोर आली. ‘न्यू नॉर्मल’ जगात पुन्हा एकदा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न समोर आला आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची गरज अधोरेखित झाली. ईमामी हेल्दी ॲण्ड टेस्टी या लोकप्रिय ब्रँडच्या नव्या उत्पादनातून रोगप्रतिकारशक्ती आतून वाढवण्याची ग्राहकांची प्राथमिक गरज भागवली जाणार आहे.

‘गोमंतकीयांच्या कौशल्यांना दिशा देण्याची हिच योग्य वेळ’

याबद्दल इमामी ग्रूपचे संचालक आदित्य व्ही. अगरवाल म्हणाले, “कोविड 19 नंतरच्या जगात कौटुंबिक आरोग्य आणि हितासंदर्भातील चिंता बरीच वाढली आहे. कुटुंबाची प्रतिकारशक्ती वाढेल अशा उत्पादनांचा आणि सप्लिमेंट्सचा ग्राहक शोध घेत असतात. अशा परिस्थितीत आमच्या संशोधन आणि विकास टीमने इमामी हेल्दी ॲण्ड टेस्टी या नावाने भारतातील पहिले इम्युनिटी बूस्टर कुकिंग ऑईल सादर केले आहे. ‘हर निवाला, इम्युनिटी वाला’ म्हणजे प्रत्येक घासात रोगप्रतिकारशक्ती हे या उत्पादनाचे वचन आहे. ग्राहकांच्या आवडीनिवडींची सखोल माहिती आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शक्यत तितके सुयोग्य उत्पादन देण्याचा ईमामीचा संपन्न वारसा आहे आणि आमचे लक्ष्यित ग्राहक या उत्पादनाचेही कौतुक करतील, असा विश्वास आम्हाला वाटतो. कारण, या उत्पादनामुळे दैनंदिन आणि नियमित स्वरुपावर त्यांच्या रोगप्रतिकारशक्तीची काळजी घेण्यात त्यांना साह्य लाभणार आहे.”
इमामी ग्रूपचे संचालक मनिष गोएंका म्हणाले, “इमामी हेल्दी ॲण्ड टेस्टी स्मार्ट बॅलन्स इम्युनिटी बूस्टर ऑईल आपल्या रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे घटक आणि चवीमुळे ग्राहकांना आवडेल, असा आम्हाला ठाम विश्वास आहे. भारतात पहिल्यांदाच खाद्यतेलामध्ये रोगप्रतिकाशक्ती वाढवणारे पाच महत्त्वाचे घटक समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. शिवाय, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात  महत्त्वाचा घटक असणाऱ्या व्हिटॅमिन सी’चा समावेश असणारे हे भारतातील पहिले खाद्यतेल आहे. ईमामी हेल्दी ॲण्ड टेस्टी स्मार्ट बॅलन्स इम्युनिटी बूस्टर ऑईलच्या वापरामुळे अगदी प्रत्येक घासाला रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची हमी मिळते.”
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here