इमामीचा हँड सॅनिटायझर्स क्षेत्रात शिरकाव

hand Sanitizer

मुंबई : 
कोविड 19 या विषाणूच्या जागतिक साथीच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर हँड सॅनिटायझर्सची (hand sanitizer) मागणी वाढलेली असतानाच इमामी लिमिटेड या भारतातील प्रमुख एफएमसीजीने बोरोप्लस या अँटिसेप्टिक क्रीमच्या क्षेत्रात आघाडीच्या स्किनकेअर ब्रँडखाली बोरोप्लस ॲडव्हान्स्ड अँटि-जर्म हँड सॅनिटायझरच्या माध्यमातून हँड सॅनिटायझर्स (hand sanitizer) क्षेत्रात प्रवेश केला आहे. कोविड-19च्या उद्रेकाच्या वातावरणात अत्यावश्यक वस्तू बनलेल्या हँड सॅनिटायझर्सची सगळीकडे तीव्र गरज निर्माण झालेली असताना कमीत कमी वेळात जास्तीत जास्त उपलब्ध उत्पादनक्षमता वापरून एक प्रभावी उत्पादन ग्राहकांना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने इमामीने हे हँड सॅनिटायझर (hand sanitizer) बाजारात आणण्यास प्राधान्य दिले आहे.

नीम आणि तुलसी यांच्या नैसर्गिक अँटिसेप्टिक गुणांची ताकद लाभलेल्या बोरोप्लस ॲडव्हान्स्ड अँटि-जर्म हँड सॅनिटायझरचा अल्कोहोल बेस70% टक्केअसून तो विविध आजारांना कारक ठरणारे 99.99 %  किटाणू काही सेकंदांमध्ये नष्ट करतो हे क्लिनिकली सिद्ध झाले असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. 

याप्रसंगी इमामी लिमिटेडच्या संचालक प्रीती ए. सुरेका म्हणाल्या, कोविड 19च्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वाढीव प्रमाणात व्यक्तिगत स्वच्छता राखण्याची मार्गदर्शक तत्त्वे आत्मसात करून त्यांचे पालन करणे आपल्यासाठी अत्यावश्यक आहे.  डब्ल्यूएचओने आणि अनेक क्लिनिकल आस्थापनांनी सांगितल्याप्रमाणे विषाणूसंसर्गविरोधी लढयात हँड सॅनिटायझर्सना कळीची भूमिका बजावायची असून ते या लढ्याचा एक महत्त्वाचा घटक आहेत.  बाजारात हँड सॅनिटायझर्सची मागणी आणि पुरवठा यांच्यात प्रचंड तफावत असून त्यामुळे आपल्याला धोका उत्पन्न होऊ शकतो. म्हणूनच आम्ही इमामी लिमिटेडच्या वतीने बोरोप्लस हँड सॅनिटायझर सादर करण्याचा निर्णय घेतला.
BoroPlus hand Sanitizer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here