‘ईएसएएफ’च्या नफ्यात तब्बल ‘एवढी’ वाढ

कोची:
केरळास्थित ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक या सामाजिक बँकेने 31 मार्च 2020 रोजी संपलेल्या वर्षात निव्वळ नफ्यात 110.86 % वाढ झाल्याची नोंद केली आहे. मागील वर्षी 90.29 कोटी निव्वळ नफ्याची नोंद झाली होती. यंदाच्या आर्थिक वर्षात हा आकडा 190.30 कोटींवर पोहोचला आहे.
या निकालांबद्दल ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी के. पॉल थॉमस म्हणाले, “बाजारपेठेत मंदी असली तरी बँकेने दमदार कामगिरी केले असल्याचे या प्रोत्साहनपर निकालांतून स्पष्ट होते. शिवाय या व्यवसायवृद्धीमुळे असेट क्वॉलिटीवर परिणाम झालेला नाही. गरीब आणि वंचितांना सक्षम करण्यावर भर देत आम्ही सगळ्यांनाच बँकिंगचा आनंद देत आहोत, हे सत्यही यातून अधोरेखित झाले आहे.”
उत्तम परताव्यासाठी ‘हे’ करा…

या वर्षात व्यवसायात 49.05 % वाढ होऊन हा आकडा 13846 कोटींवर पोहोचला. ठेवींमध्ये 62.81 % वाढ होऊन त्या 7028 कोटींवर पोहोचल्या आणि अॅडव्हान्सेसमध्ये (असेट अंडर मॅनेजमेंट) 37.11 % वाठ होऊन ते 6818 कोटींवर पोहोचले. या वर्षात एकूण एनपीए टक्केवारी 1.61% वरून 1.53% पर्यंत घसरली आणि निव्वळ एनपीए 0.77 % ते 0.64 % घसरली. तसेच, प्रोव्हिजन कव्हरेज प्रमाण मागील वर्षज्या 78.45 % यंदा 79.93 % पोहोचले.
बँकेची कॅपिटल स्थिती 24.03 % आणि प्रथम श्रेणी सीआरएआर 20.99 % आहे. नियमांनुसार ही टक्केवारी 15 % आणि 7.5 % असायला हवी. आपल्या मध्यमकालीन व्यवसाय योजनांसाठी बँकेकडे पुरेसा निधी राखीव आहे आणि द्वितीय श्रेणी साठीही पुरेशी तरतूद आहे.
सध्या ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँकेचे भारतातील 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अस्तित्व आहे. 31 मार्च 2020 रोजी बँक आपल्या 454 शाखा आणि 14 बिझनेस करस्पॉडंट एनटीटीजच्या माध्यमातून 35 लाख ग्राहकांना सेवा देत आहे. बँकेची देशभरात 222 एटीएम्स आहेत.
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here