बंगलोर :
एस्सिलॉर (essilor) या आघाडीच्या ऑप्थॅल्मिक ऑप्टिक्स कंपनी ने आज कोविड-१९ च्या लढ्यातील आपले योगदान देत प्राईम मिनिस्टर्स केअर फंडाला ७.५ दशलक्ष रूपयांची देणगी दिल्याची घोषणा केली.
एस्सिलॉर (essilor) ने अनेक उपक्रम सुरू केले असून या माध्यमातून कोविड-१९ च्या साथीचा मुकाबला करणार्या वैद्यकीय कर्मचार्यांसाठी ही कार्य केले आहे. यामध्ये विविध राज्यांतील आरोग्य विभागात काम करणार्या वैद्यकीय कर्मचार्यांना तसेच कोविड-१९ विरोधी लढा देणार्या लोकांच्या सुरक्षेसाठी ८००० प्लॅनो आय ग्लासेसचा समावेश आहे. यामुळे डोळ्यातून थेट होणार्या प्रादुर्भावापासून या लोकांचा बचाव होऊ शकेल. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येदीयुरप्पा यांनी कंपनी कडून केल्या जाणार्या योगदानाची दखल घेऊन कौतुकही केले. एस्सिलॉर (essilor) कडून विविध आरोग्य विभागांना ५०० हून अधिक सर्जिकल ग्लोव्ह्ज, ५०० शिल्ड मास्क्स आणि सॅनिटायझर्सचे वाटप बीबीएमपी आणि अन्य सामाजिक संस्थांच्या माध्यमातून देण्यात येत आहेत.
जनधन योजनेत वाटले 31 कोटी रुपये
एस्सिलॉर इंडिया चे सीईओ मार्टेन गेरेट्स यांनी सांगितले, अतिशय कठीण अशा कालावधीत आपण एकत्र येऊन प्रयत्न करत कोविड-१९ च्या साथीचा मुकाबला करणे आवश्यक आहे. कॉर्पोरेट्स, सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन वेगाने कार्य करत ज्या लोकांना जास्त गरज आहे अशा लोकांकरता खाद्यपदार्थ आणि वैद्यकीय मदत पोहोचवणे गरजेचे आहे. एस्सिलॉर (essilor) एक सामाजिक दृष्ट्या जबाबदार कॉर्पोरेट म्हणून नेहमीच पुढे राहून अशा प्रयत्नांत सकारात्मक योगदान देत सरकार आणि भारताला गरजेनुसार मदत करत आली आहे. मी माझ्या कर्मचार्यांचे त्यांनी पीएम केअर्स फंडाला दिलेल्या तसेच एस्सिलॉर कडून देण्यात आलेल्या योगदाना बद्दल आभार मानतो. आम्ही भारतासोबत आहोत आणि एकत्रितपणे आपण हे सर्व पार पाडू शकू.”
अर्थ जगताच्या ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज