आता सुरु करा फेसबुकवर ‘दुकान’

facebook shop

मुंबई :
करोनामुळे सगळेजण घरातच स्थानबद्ध झाले आहेत. त्यातच लॉकडाउनमुळे मागील पन्नास दिवसांपासून सगळे व्यवहार ठप्प असल्यानं अर्थचक्र ठप्प झालं होतं. आता हळूहळू लॉकडाउन शिथिल केला जात असला, तरी गर्दी टाळण्याचं आणि होम डिलिव्हरी सारख्या पर्यायांचा अवलंब करण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे. अशावेळी मोठ्या दुकानदारांना हे शक्य झाले पण छोट्या किराणा दुकानांना आपले दुकान ऑनलाईन आणि घरपोच साहित्य पोहोचवणे कठीण झाले होते, अशावेळी फेसबुक शॉपच्या (Facebook Shop) माध्यमातून फेसबुक या छोट्या विक्रेत्यांच्या मदतीला पुढे आले आहे.
फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्गनं एक पोस्ट लिहून याविषयी माहिती दिली आहे. “करोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अस्थिरतेतून बाहेर पडण्यासाठी छोटे दुकानदार वा व्यावसायिक प्रयत्न करत आहेत. घरी राहुन सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं जात आहे. त्याचबरोबर कोट्यवधी लोकांना त्यांची नोकरी गमवावी लागली आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवसाय ही गोष्ट सध्या खूप महत्त्वाची आहे, असं झुकेरबर्ग यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

काय करणार जिओ, फेसबुकच्या गुंतवणूकीचे?

फेसबुकनं आता वस्तुंची ऑनलाईन खरेदी विक्री सुरू करण्याच्या योजनेवर काम सुरू केलं आहे. ही सेवा अमेरिकेत सुरू झाली आहे. फेसबुकबरोबरच इन्स्टाग्रामवरही ही सुविधा उपलब्ध असणार आहे. फेसबुक शॉप्स (Facebook Shop) प्रामुख्यानं छोट्या व्यावसायिकांसाठी असणार आहे.
छोट्या व्यावसायिकांना फेसबुक शॉप्सच्या (Facebook Shop) माध्यमातून त्यांच्याकडील वस्तुंचा कॅटलॉग तयार करता येईल. ज्यामुळे ग्राहकांना पेजवरती सर्व वस्तू दिसतील. ग्राहक या वस्तुंची निवड करून खरेदी करू शकणार आहे. यासाठी कोणत्याही साईट वा अॅपची गरज असणार नाही. विशेष म्हणजे विक्रेते ग्राहकांना व्हॉट्स अॅप, मेसेंजर आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून माहिती देऊ शकतील. फेसबुक शॉप्स ही सुविधा विनामूल्य असणार आहे.

हि बातमी व्हिज्युअली  पाहण्यासाठी क्लिक करा… 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here