फेसबुकची जिओत 43574 कोटींची गुंतवणूक

facebook, jio

मुंबई :
जगातील सगळ्यात मोठ्या सोशल नेटवर्क असलेल्या फेसबुकने (Facebook) अखेर रिलायन्स उद्योग समूहातील जिओचे 10 टक्के समभाग खरेदी केल्याची घोषणा बुधवारी सकाळी केली. 5.7 अब्ज अमेरिकी डॉलर अर्थात 43574 कोटी रुपये फेसबूककडून जिओमध्ये गुंतविण्यात येणार आहेत. भारतातील सोशल मीडियामध्ये आपला परीघ आणखी विस्तारण्यासाठी फेसबूककडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
फेसबूक (Facebook) कडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिओ लिमिटेडमध्ये 5.7 अब्ज डॉलरची गुंतवणूक करीत असल्याची घोषणा आम्ही आज करतो आहोत. जिओ ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची कंपनी आहे. या गुंतवणुकीनंतर फेसबूक ही या कंपनीतील सर्वात मोठी गुंतवणूक करणारी एक लहान गुंतवणूकदार झाली आहे. जिओमधील ही गुंतवणूक भारताबाबत आमची वचनबद्धता दर्शवणारी आहे. चार वर्षांपेक्षा कमी काळात रिलायन्स जिओने 388 मिलियनहून अधिक लोकांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणलं आहे. ही बाब प्रोत्साहन देणारी आहे. त्यामुळे आम्ही देखील जिओकडे आकर्षित झालो. जिओच्या माध्यमातून आम्ही भारतात आधीपेक्षा अधिक लोकांशी कनेक्ट करण्यासाठी कटिबद्ध आहोत.
facebook, jio
काय करणार जिओ, फेसबुकच्या गुंतवणूकीचे?

Facebook ​कडे जिओचे १० टक्के शेअर ​ :

फेसबूक (Facebook)च्या गुंतवणुकीमुळे रिलायन्स जिओचे 9.99 टक्के समभाग पूर्णपणे त्या कंपनीकडे जाणार आहेत, असे रिलायन्सकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. रिलायन्स जिओचे देशात सध्या 38.8 कोटी वापरकर्ते आहेत. 2016मध्ये भारतीय टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर जिओने अवघ्या चार वर्षांमध्येच टेलिकॉम क्षेत्रात आपलं वचर्स्व निर्माण केलं आहे. जिओसोबत भागीदारी करुन सोशल मीडिया कंपनी फेसबुकने भारतातील डिजिटल मार्केटमध्ये आपले पाय रोवायला सुरुवात केली आहे.

एरोस इंटरनॅशनल आणि STX इंटरटेन्मेंट आले एकत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here