फेडरल बँकेचेही एटीएम ग्राहकांच्या दारी

Federal bank, ATM

मुंबई :
कोरोना संसर्गामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे; त्यामुळे देशामध्ये लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरु आहे. कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने नियम आणखी कडक करण्याचे ठरविले आहे. ​या​ काळात नागरिकांना अर्थ व्यवहार करणे सुलभ व्हावे यासाठी विविध बँकांनी आपापली फिरते एटीएम सुविधा सुरु केली असून, फेडरल बँकेनेही (Federal Bank) चेन्नई आणि मुंबई शहरामध्ये मोबाईल एटीएम सुविधा सुरु केली. कोविड च्या जनतेशी लढा देण्यासाठी, त्यांच्या दारात बँकिंग सेवा पोहोचवून आणि शक्यतो लोकांनी घरातून बाहेर पडू नये यासाठी हा बँकेचा उपक्रम आहे. कोणत्याही एटीएममधून कोणत्याही बँकेचा ग्राहक विनामूल्य पैसे काढू शकतात.
मुंबईत पहिल्या एटीएम व्हॅनचे उद्घाटन फेडरल बँकेचे (Federal Bank) उपाध्यक्ष आणि मुंबई झोनल हेड दीपक गोविंद पीए, फेडरल बँकेचे उपाध्यक्ष आणि मुंबई प्रादेशिक प्रमुख महेश आर., फेडरल बँकेचे मुंबई झोनचे उप उपाध्यक्ष सियाद एम.एस. यांच्या उपस्थितीत केले.
Federal bank, ATM
https://thebusinesstimes.in/kotak-mahindra-started-atm-on-wheels/

चेन्नईमध्ये या सुविधेचे उद्घाटन एसएलबीसीचे महाव्यवस्थापक सुशीलचंद्र मोहंता यांच्या उपस्थितीत फेडरल बँकेचे (Federal Bank) चेन्नई झोन चे उपाध्यक्ष इकबाल मनोज आणि फेडरल बँकेचे उप उपाध्यक्ष चेन्नई क्षेत्रीय प्रमुख राजीव व्ही.सी. यांच्या हस्ते झाले. येत्या काही दिवसात आणखी व्हॅन तैनात करण्यात येतील आणि जनतेला त्यांच्या भागात एटीएमची मागणी करण्याची सुविधा उपलब्ध होईल. लॉकडाऊन दरम्यान बँक बंगळूरू ही सुविधा देण्याचे काम करत आहे. सामाजिक बांधिलकी जपणारा हा फेडरल बँकेचा हा उपक्रम स्तुत्य आहे असे बँकेच्या व्यवस्थापनाकडून सांगितले आहे.

1 COMMENT

  1. Inpressed by the news you are taking up, especially important for people in general. Particularly useful during lockdown

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here