‘या’ सात शहरांतील रिअल इस्टेटमध्ये  होणार घसरण

flats-will-be-cheap-in-7-big-cities-

नवी दिल्ली :
कोरोनामुळे देशातील विविध उद्योगधंदे डबघाईला आले आहेत. या सगळ्याचा आर्थिक व्यवहारावर दुरगामी परिणाम देशाच्या प्रगतीवर दिसू शकतो. त्याचप्रमाणे देशातील काही महत्वाच्या शहरात कोरोनाचा फैलाव अधिक झाल्यामुळे अनेकांनी सदर शहरांतून आपले बस्तान हलवले आहे. याचा परिणाम त्या त्या शहरातील रिअल इस्टेटवर मोठ्या प्रमाणात होणार असून, एनरॉक कंपनीच्या सर्वेक्षणानुसार कोरोनानंतर यावर्षी देशातील सात मोठ्या शहरातील घरांच्या विक्रीत ३५ टक्क्यांची घसरण होऊ शकते. दिल्ली-एनसीआर (गाझियाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा, गुरुग्राम, फरिदाबाद), मुंबई महानगर क्षेत्र, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरु, पुणे आणि हैदराबाद ही सात शहरे आहेत.
कंपनीने एका अहवालात म्हटले की, व्यावसायिक संपत्तीच्या विक्रीवरही याचा मोठा परिणाम होणार आहे. या अहवालानुसार भाड्याने कार्यालय देण्याच्या व्यवसायात ३० टक्क्यांपर्यंत तसेच किरकोळ क्षेत्रात ६४ टक्केपर्यंत घसरण होऊ शकते. एनरॉक प्रॉपर्टी कन्सलट्ंटचे अध्यक्ष अनुज पुरी म्हणाले की, कमी मागणी तथा रोख रकमेच्या कमतरतेचा आधीपासून सामना करत असलेल्या भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रावर कोविड-१९ मुळे प्रतिकूल परिणाम पाहायला मिळू शकतो.
प्रॉपर्टी तज्ज्ञांच्या मते, पुढील सहा महिन्यात संपूर्णपणे मजूर परतताच बांधकाम व्यावसायिकांना भांडवल जमा करण्याची समस्या भेडसावेल. त्यामुळे अशावेळी त्यांच्याकडून उशीरही होऊ शकतो. एकूण प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आणखी एक वर्षाचा वेळ लागू शकतो. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांकडून सरकारला आणखी सवलतींची मागणी वाढत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here