‘फ्लिपकार्ट’ने केली ‘अरविंद फॅशन्स’मध्ये गुंतवणूक

बंगळुरू :
फ्लाइंग मशिन ब्रँडची मालकी असलेल्या अरविंद युथ ब्रँड्स या अलिकडेच स्थापन केलेल्या अरविंद फॅशन्सच्या (एएफएल) उपकंपनीत लक्षणीय स्वरुपातील अल्प हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी २६० कोटी रुपयांची गुंतवणूक करून फ्लिपकार्ट समूह आणि अरविंद फॅशन्स यांनी आज आपली भागिदारी अधिक बळकट केली.
४० वर्षांचा वारसा असलेल्या फ्लाइंग मशीन या ऐतिहासिक ब्रँडच्या उत्पादनांची विक्री गेल्या सहा वर्षांहून अधिक काळ फ्लिपकार्ट समूहाच्या फ्लिपकार्ट व मिंत्रा या व्यासपीठांवर करण्यात येत आहे. डेनिमला प्राधान्य देणारा (डेनिम-फर्स्ट) फ्लाइंग मशिन हा भारतातील आघाडीच्या डेनिम ब्रँड्सपैकी एक आहे. ब्रँडचा वारसा, डिझाइनच्या जाणीवा आणि तरुणाईला आकर्षित करून घेण्याची क्षमता यामुळे मेट्रो आणि त्यापलिकडील शहरांमध्ये अतिशय प्रबळ असा स्टाइल पार्टनर म्हणून या ब्रँडकडे बघितले जाते. या गुंतवणुकीच्या माध्यमातून आकर्षक किमतीत मूल्याचा पुरेपूर परतावा देणाऱ्या उत्पादनांसाठी संशोधन करून त्यांची निर्मिती करण्यासाठीच्या संधी व परस्परहिताचा शोध घेण्यासाठी फ्लिपकार्ट समूह आणि अरविंद फॅशन्स एकत्र काम करतील.
रोसारीचा आयपीओ 13 जुलैपासून

या गुंतवणुकीबाबत फ्लिपकार्ट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती म्हणाले, “फ्लाइंग मशीन हा ब्रँड भारतातील घराघरात परिचित असून तरुणांमध्ये लोकप्रिय असलेला हा ब्रँड शैली आणि मूल्यपरताव्यासी जोडला गेलेला आहे. या गुंतवणुकीच्या माध्यमातून अरविंद युथ ब्रँड्सच्या टीमशी जोडले जाऊन त्यांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठेचा विस्तार करण्याचे, तसेच गेल्या काही दशकांमध्ये उभारणी केलेल्या या ब्रँडची इक्विटी अधिक प्रबळ करण्याचे आमचे ध्येय आहे.”
अरविंद फॅशन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जे. सुरेश म्हणाले, “अरविंद युथ ब्रँड्स आणि फ्लाइंग मशीनसाठी विक्री व्यासपीठाचे सर्व पर्याय विकसित करण्यावर आम्ही भर देत असून फ्लिपकार्ट समूहासमवेतच्या या भागिदारीमुळे ऑनलाइन क्षेत्रातील आमच्या विस्तार धोरणाला गती मिळेल. फ्लिपकार्ट समूहासमवेत पूर्वीपासून असलेली मजबूत भागिदारी आणि ऑनलाइन फॅशन क्षेत्रातील त्यांचे अस्तित्व लक्षात घेता अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करणे संयुक्तिक होते, ज्यात फ्लिपकार्ट आणि मिंत्रा हे फ्लाइंग मशीनसाठी आमचे प्रथम पसंतीचे ऑनलाइन भागिदार असतील. एक्सक्लुझिव्ह ब्रँड स्टोअर्स, डिपार्टमेंट स्टोअर्स आणि मल्टी-ब्रँड स्टोअर्स यांच्या माध्यमातून ऑफलाइन विक्री वाढवण्याची प्रक्रिया देखील सुरूच आहे.
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here