आता मिळणार साहित्य 90 मिनिटांत घरपोच

बंगळुरू :
गेल्या दोन वर्षांपासून भारतातील ऑनलाइन, तसेच ऑफलाइन रिटेल क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. परंतु, गेल्या ५० दिवसांत अधिक चापल्य आणि कार्यक्षमतेसह कल्पक पर्याय आणि व्यवसाय प्रारूप विकसित होताना आपण पाहिले. साथीच्या आजाराच्या या वर्षातील सहा महिने उलटून गेले असताना पुरवठा साखळीतही आमूलाग्र बदल झाले आहेत. अनेकांसाठी अत्यंत सोयीची म्हणून ओळखली जाणारी अतिसूक्ष्म स्थानिक (हायपरलोकल) श्रेणी आता भारतात दीर्घकालीन अत्यावश्यक सेवा म्हणून रूढ होत आहे. ग्राहकांची मानसिकता आणि अपेक्षांमध्ये यामुळे लक्षणीय बदल झाला असून २०२०च्या अखेरीपर्यंत भारतीय हायपरलोकल बाजारपेठ २,३०६ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडेल आणि या बाजारपेठेचा सीएजीआर लक्षणीय असेल, असा अंदाज आहे. 
या पार्श्वभूमीवर फ्लिपकार्टच्यावतीने आज ‘फ्लिपकार्ट क्विक’ या आपल्या अतिसूक्ष्म स्थानिक पातळीवरील (हायपरलोकल) सेवेचा शुभारंभ केला. आपली तंत्रज्ञानात्मक क्षमता आणि पुरवठा साखळी सुविधा यांच्या बळावर फ्लिपकार्ट क्विक या सेवेची रचना केली आहे. निवड करण्यासाठी वैविध्यपूर्ण पर्याय, सर्वोत्तम गुणवत्ता आणि लोकेशन मॅपिंगची नवी तंत्रज्ञान चौकट यांच्या आधारे ग्राहकांना अभूतपूर्व असा अनुभव देणे हे फ्लिपकार्टचे उद्दिष्ट आहे. उत्पादनांच्या उपलब्धतेची चौकट अधिक व्यापक करून आणि ग्राहकांना अधिक वेगवान डिलिव्हरीसाठी त्यांच्या परिसरातील फ्लिपकार्ट हब्जमधून उत्पादनांची मागणी नोंदवण्याची संधी देऊन नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचणे हे या हायपरलोकल डिलिव्हरी मॉडेलचे ध्येय आहे.
उत्पादनांपर्यंत पोहोचण्याची संधी, उत्पादनांची उपलब्धता आणि किफायतशीरपणाच्या अनुषंगाने ग्राहकांच्या दैनंदिन खरेदी अनुभवाला आधुनिक स्वरूप देताना फ्लिपकार्ट क्विक पहिल्या टप्प्यात ग्रोसरी, फ्रेश, डेअरी, मीट, मोबाइल्स, इलेक्ट्रॉनिक अॅक्सेसरीज, स्टेशनरी आयटम्स आणि होम अॅक्सेसरीज या श्रेणीतील दोन हजारांहून अधिक निवडक वस्तू ग्राहकांना उपलब्ध करून देणार आहे. ग्राहक आपल्या सोयीनुसार पुढील ९० मिनिटांत ऑर्डर नोंदवण्याचा किंवा दोन तासांच्या कालावधीची नोंद करण्याचा पर्याय स्वीकारू शकतात. ग्राहक दिवसातल्या कुठल्याही वेळी ऑर्डर नोंदवू शकतात आणि सकाळी सहा ते मध्यरात्री पर्यंत आपल्या नोंदणीनुसार डिलिव्हरी घेऊ शकतात. किमान डिलिव्हरी फीची सुरुवात २९ रुपयांपासून आहे. 

डिजिटल शिक्षणाचा ‘आकाश’ मार्ग

या शुभारंभाबाबत फ्लिपकार्टचे उपाध्यक्ष संदीप कारवा म्हणाले, “स्थानिक पातळीवर उपलब्ध उत्पादने आणि एका विशिष्ट विभागातील ग्राहक यांना परस्परांशी जोडणे म्हणजे अतिसूक्ष्म स्थानिक क्षमता अशी हायपरलोकल कपॅबिलिटीची साधी व्याख्या करता येईल. भारतातील प्रत्येक घर आपल्या परिसरातील किराणा दुकानाशी जोडलेले असल्यामुळे हे भारतासाठी अत्यंत उत्तम असे मॉडेल आहे. किंबहुना, ज्याला आपण हायपरलोकल कंटेक्स्ट म्हणजे अतिसूक्ष्म स्थानिक संदर्भ म्हणतो, त्याच्याशी भारतीय कुटुंब इतके परिचयाचे आहेत की, विक्रेते, दुकानदार आणि सेवा पुरवठादारांशी अत्यंत खोल, कौटुंबिक बंध निर्माण करण्याकडे त्यांचा कल असतो आणि आता ई–कॉमर्सच्या सोयीमुळे ही बाब अधिकच सुलभ होणार आहे. डार्क स्टोअर मॉडेलपासून आम्ही सुरुवात करत असून ज्यात विक्रेत्यांना ग्राहकांच्या जवळच्या परिसरात आपल्या उत्पादनांची साठवणूक करता येईल. या मॉडेलमध्ये स्थानिक पातळीवरील उद्योजकतेला वाव मिळून उद्योगविषयक नवी धोरणे आणि भागिदाऱ्यांनाही चालना देण्याची क्षमता आहे. आज फ्लिपकार्ट क्विक या आमच्या हायपरलोकल क्षमतेमुळे परिसरातील सर्व किराणा दुकानांचे जाळे केवळ एका क्लिकसरशी आमच्या व्यासपीठावर आणण्याची आमची क्षमता आहे.”
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here