‘फ्लिपकार्ट’ देणार ७०००० नोकऱ्या…

Flipkart

बंगळुरू:
करोना आणि त्यामुळेच्या लॉकडाऊनमुळे एकीकडे मोठ्याप्रमाणात रोजगार जात असताना ‘फ्लिपकार्ट’ने मात्र बिग बिलियन डेजच्या (बीबीडी) माध्यमातून ७०,०००हून अधिक प्रत्यक्ष आणि लाखो हंगामी अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करण्यास मदत करत आहे.
फ्लिपकार्टच्या पुरवठा साखळीच्या सर्व टप्प्यांवर थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, ज्यांत डिलिव्हरी एग्झिक्युटिव्ह, पिकर्स, पॅकर्स आणि सॉर्टर्स यांचा समावेश आहे. त्याचबरोबर फ्लिपकार्टच्या विक्रेते भागिदारांच्या ठिकाणी आणि किराणा दुकानांमध्ये अतिरिक्त अप्रत्यक्ष रोजगार निर्माण केले जातील. याला जोड म्हणून सगळा ई-कॉमर्स व्यवसाय उत्सवकाळासाठी सज्ज होत असताना विक्रेत्यांची ठिकाणे आणि वाहतूक भागीदारांच्या पूरक उद्योगांतही रोजगारनिर्मिती केली जाईल.
बिग बिलियन डेजची गुंतागुंत आणि भव्यता लक्षात घेता त्यात क्षमता, साठवणूक, छाननी, पॅकेजिंग, मनुष्यबळ, प्रशिक्षण आणि वितरण यांच्यात मोठ्या गुंतवणुकीची गरज पडते आणि त्यातून उत्सवपर्वात अतिरिक्त रोजगाराची निर्मिती होते. या वर्षी फ्लिपकार्ट पुरवठासाखळीत जवळपास ७०,००० जणांना रोजगार देणार असून त्याचबरोबर विक्रेते आणि व्यवसायातील अन्य भागीदारांच्या कामकाजाच्या ठिकाणी लाखो अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करणार आहे. फ्लिपकार्टच्या डिलिव्हरीच्या अंतिम टप्प्यासाठी ५०,०००हून अधिक किराणा दुकानांना सोबत घेतल्यामुळे या उत्सवकाळात लक्षावधी पॅकेजेसची डिलिव्हरी करण्यासाठी हजारो हंगामी रोजगार तयार होतील.
आता मिळणार कोविड-19 पासून ‘मॅक्स’ सुरक्षा
flipkart
फ्लिपकार्टच्या ईकार्ट आणि मार्केटप्लेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अमितेश झा म्हणाले, “ई कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून आम्ही आमच्या कामगारांच्या प्रशिक्षणात आणि रोजगारांत किती गुंतवणूक करतो आणि कौशल्यविकासाला हातभार लावून रोजगारक्षमतेत कसे योगदान देतो, ते सर्वज्ञात आहे. रोजगारनिर्मिती करून आणि आमच्या विक्रेत्यांना या काळात व्यवसायवृद्धीची संधी निर्माण करून आम्ही या उद्योगाच्या आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाला हातभार लावत आहोत. थेट नोकरीत घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे पुरवठा साखळीच्या व्यवस्थापनाचे आकलन व्यापक बनविण्यासाठी फ्लिपकार्ट त्यांच्यासाठी शिकवणीचे वर्ग आणि डिजिटल प्रशिक्षण यांचा मेळ साधणार आहे. यांत ग्राहक सेवा, डिलिव्हरी, उभारणी, सुरक्षा, स्वच्छतेचे उपाय याचबरोबर हातात धरून वापरण्याच्या उपकरणांची कार्यपद्धती, पीओएस मशीन्स, स्कॅनर्स, विविध मोबाइल अॅप्लिकेशन्स आणि ईआरपीज यांचा समावेश आहे. या काळातील प्रशिक्षणाचा सहभागी कामगारांना भविष्यवेधी कौशल्ये आत्मसात करण्यासाठी उपयोग होईल आणि भारतात वेगाने वाढणाऱ्या ई कॉमर्स उद्योगात कारकीर्द घडवण्यासाठी ते सक्षम होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here