‘फोर्स’ने दिल्या सरकारला १००० ॲम्ब्युलन्स

मुंबई :
एकीकडे टाळेबंदी शिथिल करत असताना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसते. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने आपल्या न्यायकक्षेत आरोग्य निगा पायाभूत सुविधा बळकट करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर फोर्स मोटर्सने आंध्रप्रदेश सरकारला एक हजारहून अधिक ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिल्या. ज्यामध्ये 130 प्रगत जीवरक्षक ॲम्ब्युलन्स, 282 मुलभूत जीवसाह्य ॲम्ब्युलन्स आणि 656 पेक्षा अधिक मोबाईल मेडीकल युनिट्सचा समावेश आहे. 
या सगळ्या ऍम्ब्युलन्समुळे आरोग्य देखभाल पायाभूत सुविधेचे महत्त्वपूर्ण अद्ययावतीकरण होऊन वेळेत पोहोचणे सुधारून, रिस्पॉन्स टाईम कमी होणार आहे. आंध्र प्रदेश सरकारला मोबाईल मेडीकल युनिट्स सुपूर्द करण्यात आले आहेत, ते कोविड तपासणी सुविधेने सुसज्ज आहेत. नागरिकांनी 104 क्रमांकावर संपर्क साधून या सुविधेचा लाभ घेता येईल.
याप्रसंगी बोलताना फोर्स मोटर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रसन फिरोदीया  म्हणाले की, “आपल्या आरोग्य देखभाल यंत्रणेतील कमतरता महामारीच्या उद्रेकामुळे अधोरेखित झाल्या. स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारच्या वतीने सार्वजनिक आरोग्य पुरवठा यंत्रणेने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आपली सेवा अद्ययावत केली त्यांची ही कृती हृदयस्पर्शी ठरली. आंध्र सरकारने फोर्सच्या विश्वास सार्थ ठरवलेल्या, भरवशाच्या ट्रॅव्हलर ॲम्ब्युलन्सला पसंती दिल्याने आम्हाला आनंद वाटतो. इतर राज्यांमध्ये देखील अशाच पद्धतीचे साह्य मिळावे ही आशा करतो.”

…म्हणून घसरले सोन्याचे दर

टाईप बी ॲम्ब्युलन्स ही मुलभूत प्रकारात मोडणारी ॲम्ब्युलन्स असून ज्या रुग्णांना वाहतुकीदरम्यान कोणत्याही उपचाराची आवश्यकता नसते, अशांना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याची सोय या ॲम्ब्युलन्समधून करण्यात येते. तर ज्या रुग्णांना वाहतुकीदरम्यान मुलभूत देखरेख तसेच रुग्णाच्या शरीराला काट-छेद न देता एअरवे मॅनेजमेंटची आवश्यकता असते अशा रुग्णांसाठी टाईप सी किंवा बेसिक लाईफ सपोर्ट ॲम्ब्युलन्सची सोय असणार आहे. तर टाईप डी ॲम्ब्युलन्स किंवा ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट ॲम्ब्युलन्समध्ये ज्या रुग्णांना देखभालीत अतिदक्षता त्याचप्रमाणे एअरवे मॅनेजमेंट आवश्यक पुरवली जाते.ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट ॲम्ब्युलन्स जीवरक्षक साहित्य जसे डिफायब्रिलेटर, ट्रान्सपोर्ट वेंटीलेटर, बीपी एपारेट्स, स्कूप स्ट्रेचर, स्पाईन बोर्ड इत्यादींची सुविधा देण्यात येते. जेणेकरून अॅम्ब्युलन्समधून अतिशय आजारी रुग्णाला वाहतुकीदरम्यान उपचार देण्यात मदत मिळेल.
त्याशिवाय फोर्स मोटर्सकडे मोबाईल मेडीकल युनिटचा पुरवठा करण्याची क्षमता असून याद्वारे दुर्गम भागात सल्ला तसेच उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र वसविण्यात येत आहेत. या महामारीचा प्रतिकार करण्यासाठी राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाने सर्व प्रकारच्या ॲम्ब्युलन्सचे नियोजन केले आहे. जेणेकरून परिस्थितीनुसार सुविधा पुरवणे सोपे जाईल.
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here