फोर्डला 2 अब्ज डॉलरचे नुकसान

ford

न्यूयॉर्क :
प्रख्यात वाहननिर्माती कंपनी फोर्ड (ford) ने आपला पहिल्या तिमाहीचे ताळेबंद जाहीर केला असून, यानुसार कंपनीला सुमारे दोन अब्ज डॉलरचे प्रचंड नुकसान सहन करावे लागले आहे. आणि कंपनीच्या म्हणण्यानुसार पुढील तीन महिन्यात हे नुकसान तब्बल अडीचपट वाढून पाच अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.  
गेल्या तिमाहीमध्ये कंपनीला ५३२ मिलियन डॉलरचा तोटा झाला होता. या तुलनेत या तिमाहीमध्ये व्याज, कर आणि विशेष वस्तूंमुळे हे नुकसान ५ अब्ज डॉलरपर्यत होण्याची शक्यता आहे. फोर्डला दक्षिण अमेरिकेमध्ये काही फायदा झाला आहे. मात्र, जगभरात मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. कंपनीने सांगितले एकट्या उत्तर अमेरिकेमध्ये १.९ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.
ford
एमजीच्या गाड्यांमध्ये आता मेडक्लीनची ‘हवा’…
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे जगभरातील सर्वच डिलरशीप बंद आहेत. त्याचवेळी आर्थिक मंदीच्या सावटामुळे अनेकांना कामावरून कमी करण्यात आले आहे. तर अनेकांची पगार कपात झाली आहे. यामुळे ग्राहकांची कार खरेदी करण्याची इच्छा आणि गरज दोन्हींमध्ये घट झाली असल्याचा परिणाम विक्रीवर झाल्याचे ford कंपनीने स्पष्ट केले आहे.  
कंपनीच्या उत्पन्नामध्ये १५ टक्क्यांची घट झाली आहे. यामुळे हे उत्पन्न ३४.३ अब्ज डॉलरवर आले आहे. कार विक्रीमध्ये २१ टक्क्यांची घट झाल्याने हा परिणाम झाला आहे. २.२ अब्ज डॉलरचा तोटा होवूनही कंपनीने अतिरिक्त कर्ज घेतल्याने कंपनीकडे ३४ अब्ज डॉलर उरले असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. 
ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here