‘आकाश’च्या ऑनलाईन विद्यार्थ्यांत चौपट वाढ

मुंबई :
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीने भारतातील एज्युटेक क्षेत्राला चालना दिली आहे. या टाळेबंदीमध्ये आकाश डिजीटल या परीक्षांचा सराव करून घेणाऱ्या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये मागील वर्षासोबत तुलना करता एप्रिल 2020 मध्ये नियमित सक्रीय वापरकर्त्यांच्या प्रमाणात चारपट वाढ दिसून आली. एप्रिल 2019 दरम्यान हे प्रमाण 6,800 इतके होते तर आकाश लाइव्ह क्लासमुळे युजर्सचे प्रमाण वाढून सुमारे 18,000 वर पोहोचले. 
वास्तविक मागील टाळेबंदीच्या तुलनेत प्रवेश संख्येत मोठी वाढ होते आहे, टाळेबंदीपूर्वी मार्च 2020 ची तुलना करता एप्रिल 2020 मधील नियमित प्रवेशकर्त्यांच्या संख्येत तीन पट वाढ दिसून आली. आकाश आयट्युटर अॅपवरील नियमित सक्रीय वापरकर्त्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ दिसून आली. मार्च 2020 दरम्यान हे प्रमाण 7000 होते, तर एप्रिल 2020 दरम्यान हे प्रमाण 34,500 इतके होते. आकाश लाइव्ह क्लास वापरकर्त्यांची संख्या मार्च 20 दरम्यान 6,300 होती, ही तीन पटीने वाढून एप्रिल 2020 दरम्यान अंदाजे 18,000 पर्यंत पोहोचली.  

लॉकडाऊनमध्ये अभियंते शिकताहेत नवीन तंत्रज्ञान 
aksh
आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेडचे डायरेक्टर आणि सीईओ आकाश चौधरी म्हणाले की, “आमच्या एज्युटेक मंचाला मिळत असलेला अमाप प्रतिसाद पाहून मन भरून येते. लॉकडाऊनच्या काळात तसेच यापुढे देखील आम्ही विद्यार्थ्यांना घरातून अभ्यास करण्यासाठी साह्य करणार आहोत. या मार्गाने कोविड – 19 च्या पार्श्वभूमीवर शिक्षणात आलेल्या अडथळ्यावर आपण संघटितपणे मात करू.”
आकाश डिजीटलद्वारे आकाश लाइव्ह, आकश आयट्युटर आणि आकाश प्रॅक्टेस्ट उत्पादने देऊ करते. आकाश लाइव्हच्या माध्यमातून लाइव्ह ऑनलाइन वर्गात सर्वोत्तम शिक्षक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले जातात. तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे त्वरीत निरसन शक्य होते. ज्या विद्यार्थ्यांच्या घराजवळ खात्रीशीर कोचिंग पर्याय नाही, त्यांच्यासाठी हा पर्याय आदर्श आहे. आकाश आयट्युटरद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीने आकाशच्या अनुभवी शिक्षकांनी तयार केलेली ध्वनिमुद्रित व्हीडियो व्याख्याने पाहता येतात. जेणेकरून स्वत:च्या सोयीने संकल्पना पक्क्या करणे विद्यार्थ्यांना शक्य होते.
ताज्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here