फ्रँकलिन ठरला बाजारातील कोरोना ‘बळी’

franklin

​मुंबई :
​कोरोना आणि त्यामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनचा फटका आता रोखे बाजार आणि गुंतवणूक क्षेत्राला बसू लागला असून, ​फ्रँकलिन (franklin) टेम्पल्टन म्युच्युअल फंडाने ४.१ अब्ज डॉलर (जवळपास ३० हजार कोटी ) डेट म्युच्युअल फंडाचा व्यवसाय ​बंद करण्याचे ठरवले आहे. आर्थिक चणचण निर्माण झाल्याने कंपनीने हा कठोर निर्णय घेतला आहे.
कंपनीने बंद केलेल्या डेट फंड योजनांमध्ये नवीन गुंतवणूक तसेच नुतनीकरण आणि पैसे काढून घेण्यास गुंतवणूकदारांना तूर्त मनाई केली आहे.​​देशात करोना रोखण्यासाठी लाॅकडाऊन सुरु आहे. हा सर्वात मोठा लाॅकडाऊन आहे. यामुळे देशातील रोखे बाजाराचे (बाँड मार्केट) मोठे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत व्यवसाय गुंडाळणे हाच एकमेव पर्याय आपल्यासमोर होता जो गुंतवणूकदारांच्या दृष्टीने हिताचा आहे, असे फ्रँकलिन (franklin) टेम्पल्टन आपल्या वेबसाइटवर म्हटलं आहे.​
आजचा फ्रँकलिन टेम्पल्टन कंपनीचा निर्णय म्युच्युअल फंड उद्योगासाठी दुर्देवी आहे. असेच संकट इतर म्युच्युअल फंड कंपन्यांवर तर नाही ना, अशी भीती सामान्य गुंतवणूकदारांच्या मनात आहे, असे मत के.आर चोक्सी सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक देवेन चोक्सी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, रिझर्व्ह बँक आणि इतर नियामकांनी तातडीने वित्तीय बाजारपेठेला मदत करायला हवी.
franklin
…म्हणून आहे म्युच्युअल फंड स्मार्ट गुंतवणूक

​कोरोना​ आणि लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काॅर्पोरेट बाँडच्या काही श्रेणींमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रोकड टंचाई दिसून आली आहे. त्यामुळे काही गुतंवणूक योजना बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे फ्रँकलिन (franklin) टेम्पल्टन म्युच्युअल फंडांने म्हटलं आहे. बंद केलेल्या सहा योजनांचा हिस्सा म्युच्युअल फंड उद्योगात १.४ टक्के आहे, असा दावा असोसिएशन आॅफ म्युच्युअल फंड्स आॅफ इंडिया या संघटनेने केला आहे. त्यामुळे त्याची मोठी झळ बसणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अर्थ-उद्योग जगतातील ताज्या मराठी बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज.  ​

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here