‘एलजी पॉलिमर्स’मधून गॅसगळती; ८ जणांचा मृत्यू

LG polymers

विशाखापट्टणम:
आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणममधील व्यंकटपूरम गावामध्ये गुरुवारी पहाटे 3 वाजता LG polymers केमिकल फॅक्ट्रीतील गॅस लीक झाल्यामुळे 8 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन बालकांचाही समावेश आहे. तर एक हजारपेक्षा जास्त लोक आजारी पडले आहेत. हा गॅस एलजी पॉलिमर्स (LG polymers) इंडस्ट्रीच्या प्लांटमधून लीक झाल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्याने तीन लोकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. या घटनेमुळे गावामध्ये भीतीचे वातावरण आहे. व्यंकटपूरम गावाच्या जवळपास असलेल्या लोकांनी श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे म्हटले आहे. काही लोकांना चक्करही येत आहे. काही लोकांच्या शरीरावर लाल चट्टे पडले आहेत.
एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीमला घटनास्थळावर पाठवण्यात आले आहे. पोलीस आणि प्रशासनाने स्थानिक लोकांच्या मदतीने बचाव कार्य सुरु केले आहे. गोपालपट्टनम सर्कलचे पोलीस अधिकारी रमान्या यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार त्यांना जवळपास 50 लोक रस्त्यावर बेशुद्ध आढळून आले. LG polymers इंडस्ट्रीवर पोहोचण्यासाठी खूप अडचणींना सामोरे जावे लागले. ज्यामुळे आसपासच्या तीन किलोमीटर अंतरावरील परिसरावर याचा परिणाम जाणवला. ही वायू गळती नेमकी कशामुळे झाली याचे अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी वी विनय चंद हे देखील दाखल झालेले आहेत. त्यांनी सांगितले की, काहीजणांना श्वसनास त्रास जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात ऑक्सिजन दिला जात आहे.
LG polymer
सोने आणि कच्च्या तेलाच्या किंमतीत सुधारणा
या दुर्घटनेमुळे बेशुद्ध पडलेले तसेच श्वसनास त्रास होऊ लागलेल्या शेकडो जणांना शहरातली किंग जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यामध्ये लहान मुलं व वृद्धांचा मोठ्या संख्येने समावेश आहे. तसेच, दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींनी घटेनेबद्दल ट्विट केलं आहे. घटनास्थळाच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले असून, गृहमंत्राल व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण याबाबत बोलणं झालं असल्याचंही ते म्हणाले. मी विशाखापट्टणममधील प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी व कल्याणार्थ प्रार्थना करतो, ”असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदींनी एडीएमएबरोबर बैठक बोलावली आहे. तसेच, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्याशी देखील पंतप्रधान मोदींनी दुर्घनटेनेच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली असून केंद्राकडून सर्वोतोपरी मदत केली जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
LG polymer
अर्थ जगतातील बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आमचे युट्यूब चॅनेल 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here