गोव्यात आता ‘स्मार्ट वॉक-इन ‘कोरोना’ सॅम्पल किऑस्क’

पणजी :
गोवा सरकारने विप्रो जीई हेल्थकेअरच्या साह्याने ‘स्मार्ट किऑस्क’ बसवले आहेत. कोविड-19 च्या लोकसंख्येवर आधारित चाचण्यांसाठी या किऑस्कचा वापर होणार आहे. या उपक्रमामुळे वेगवान, दमदार आणि सहजसोप्या पद्धतीने सँपल गोळा करून सामाजिक पातळीवरील चाचण्यांची वाढती गरज भागवली जाईल. विप्रो जीई हेल्थकेअरने आपल्या सीएसआर उपक्रमाच्या माध्यमातून राज्यभरात अशा 12 ‘स्मार्ट किऑस्क’ची रचना करून ते बसवले आहेत.
हे किऑस्क पुढील भागात कार्यरत आहेत : वेरणा इंडस्ट्रिअल इस्टेट, मापसा इंडस्ट्रिअल इस्टेट, दाभोळी विमानतळ, मार्मागोवा पोर्ट ट्रस्ट आणि दोडामार्ग, केरी आणि पत्रादेवी येथील सीमा.
या ‘स्मार्ट किऑस्क’ची रचना विप्रो जीईच्या बंगळुरु येथील इनोव्हेशन सेंटरमधील अत्यंत आधुनिक आणि एकमेवाद्वितीय अशा ई-क्यूब या डिझाइन स्टुडियोमध्ये करण्यात आली आहे. सँपल गोळा करताना आरोग्य कर्मचारी आणि नागरिक अशी सगळ्यांची सुरक्षितता जपली जावी याची खातरजमा करण्यासाठी आम्ही अत्याधुनिक ‘स्मार्ट किऑस्क’ सादर केले आहेत. गोव्यात कोविड-19 चा प्रसार रोखण्यात हे किऑस्क फार मोठी मदत करतील, असे गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले.

‘सीपीटी’ ठरणार कोरोना रुग्णांसाठी नवी आशा ?

सध्या आपल्यासमोर जे संकट आहे अशा परिस्थितीशी सामना करताना सरकार आणि उद्योगांमधील हे परिणामकारक संबंध फार महत्त्वाचे ठरतात. विप्रो जीई हेल्थकेअरने गोव्यात 12 ठिकाणी नाविन्यपूर्ण किऑस्क बसवले आहेत. त्यांच्या सीएसआर उपक्रमांच्या माध्यमातून या किऑस्कची रचना आणि उभारणी केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.आपले कर्तव्य बजावत असताना डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही कोविड-19 ची लागण होते आहे, हे फारच दुर्दैवी आणि क्लेशकारक आहे. यातून उपचार पद्धतींमधील त्रुटीही समोर येतात, असे विप्रो जीई हेल्थकेअरचे व्यवस्थापकीय संचालक नलिनीकांत गोलागुंटा म्हणाले.
बंगळुरु येथील आमच्या डिझाइन टीमने तयार केलेल्या या ‘स्मार्ट किऑस्क’मुळे सँपल्स घेताना संशयित कोविड-19 रुग्ण आणि आरोग्य कर्मचारी यांच्यातील संपर्क कमी केला जातो त्यामुळे त्यांना लागण होण्याची शक्यताही लक्षणीय प्रमाणात कमी होते. आम्ही ज्या समुदायात काम करतो तो समाज आणि लोकांचे आयुष्य सकारात्मक पद्धतीने बदलावे हा आमच्या सीएसआरचा मुख्य उद्देश आहे. या पर्यायाची अमलबजावणी करताना गोवा सरकारसोबत भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद आहे आणि या प्रणालीचा वापर करू इच्छिणाऱ्यांना आम्ही हे डिझाइन मोफत उपलब्ध करून देणार आहोत.

कसे आहे स्मार्ट वॉक-इन सँपल कलेक्शन किऑस्क :
‘स्मार्ट किऑस्क’मध्ये दोन भाग आहेत. एक नागरिकांसाठी आणि एक आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी. हे दोन्ही भाग पारदर्शक मात्र एअरटाईट म्हणजे हवाही जाऊ शकणार नाही अशा पद्धतीने वेगळे करण्यात आले आहे. दोन्ही भागांना स्वतंत्र प्रवेशद्वार, वीज आणि हवा खेळती राहण्याची सोय आहे. आरोग्यकर्मचारी आणि नागरिकांमध्ये संवाद साधण्यासाठी यात माइक आणि स्पीकर आहेत.  मधल्या पार्टिशनमध्ये बदतला येणारे ग्लव्हज आणि सॅनिटायझिंग जेल डिसपेंसर आहे. त्यामुळे सँपल सुरक्षित पद्धतीने घेतले जाण्याची खातरजमा होते.
अटेंडंट (पीपीई घातलेले) आधी तपासणीसाठी येणाऱ्यांची प्राथमिक माहिती गोळा करतील : साधारण माहिती (वजन, वय, सध्या असलेले काही आजार), व्यक्तीच्या प्रवासाचा इतिहास, ते कोविड-19 रुग्णांच्या संपर्कात आले होते का हे विचारले जाईल आणि आयआर टेम्परेचर गनच्या साह्याने शरीराचे तापमान तपासले जाईल. गोवा सरकार वापरत असलेल्या अॅपवर ही माहिती साठवली जाईल. त्यानंतर नागरिकांना तपासणीसाठी सँपल मिळवण्याचे किट (स्वॅब) दिले जाईल. त्यानंतर त्यांना सँपल कलेक्शन भागात नेले जाईल जिथे आरोग्य कर्मचारी (जो दुसऱ्या भागात आहे) सँपल घेईल, स्वॅब त्या नागरिकाला परत करेल, नागरिकाने स्वॅब तिथे असलेल्या छोट्या डबी आणि बाटलीमध्ये ठेवायचा, ती डबी आइस बॉक्समध्ये टाकायची आणि बाहेर पडायचे.
प्रत्येक सँपलनंतर संपूर्ण किऑस्क जंतूनाशकाने स्वच्छ केले जाईल. 

ताज्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here