‘या’ कंपनीला मिळाला ‘रिटेल’साठीचा पहिला ट्रेडमार्क 

मुंबई :
गोदरेज उद्योगसमूहातील आघाडीची कंपनी गोदरेज अँड बॉयसचा ब्रँड असलेली युअँडअस ही आपल्या विशेष रिटेल स्टोअर फॉरमॅटची ट्रेडमार्क नोंदणी करणारी पहिली भारतीय कंपनी बनली आहे. कंपनीने केलेल्या घोषणेनुसार युअँडअस होम डिझाईन स्टुडिओचे अनोखे स्वरूप व संकल्पना यासाठी ट्रेडमार्क तसेच नाविन्यपूर्ण लेआऊट, फॉरमॅट आणि बाह्यरूप, अंतर्गत सजावट यासाठी अतिरिक्त ट्रेडमार्क्सची नोंदणी करण्यात आली आहे.
गोदरेज अँड बॉयसचे बिझनेस युनिट असलेल्या गोदरेज इंटेरिओचा भाग असलेल्या युअँडअस मध्ये घरातील अंतर्गत रचना, सजावट यासाठी डिझाईन तसेच बांधकाम संबंधी सर्व सेवा-सुविधांचा जागतिक दर्जाचा सह-निर्माण अनुभव प्रदान केला जातो.  मुंबई, ठाणे, पुणे, बंगलोर आणि हैदराबाद या शहरांमध्ये युअँडअस होम डिझाईन स्टुडिओ उभारण्यात आले असून प्रत्येक स्टुडिओ अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाने सुसज्ज असून त्याठिकाणी विशेष डिझाईन तज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे.  ग्राहककेंद्री संरचना आणि त्याच्या मुळाशी रचनात्मक दृष्टिकोन यावर आधारित युअँडअस होम डिझाईन स्टुडिओमध्ये ग्राहकांना असीमित अनुभव प्रदान केला जातो, त्यांच्या गरजेनुसार वैविध्यपूर्ण डिझाईन पर्याय, उच्च दर्जाचे साहित्य आणि प्रकल्प व्यवस्थापन साधने तसेच या सर्वांच्या सोबतीने नाविन्यपूर्ण व पेटंटेड तंत्रज्ञान हे सर्व युअँडअस होम डिझाईन स्टुडिओमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करवून देण्यात आले आहे.
गोदरेज इंटेरिओचे चीफ ऑपरेटींग ऑफिसर अनिल एस. माथूर यांनी सांगितले, “आजच्या काळातील जागतिक पातळीवरील अग्रेसर रिटेलर्सनी आपल्या रिटेल संचालनाला अनोखे स्वरूप मिळवून देण्यासाठी अशाच प्रकारच्या ट्रेड ड्रेस रजिस्ट्रेशन्समार्फत आपल्या प्रत्यक्ष आणि डिजिटल उपस्थितीची असीमित सांगड घातली आहे. युअँडअस रिटेल स्टोअर डिझाईन ट्रेडमार्क्स हे अशा प्रकारचे भारतातील पहिलेच ट्रेडमार्क्स आहेत, स्पेशलाइज्ड रिटेल फॉरमॅट्ससाठी हा नवा मापदंड आहे आणि याद्वारे आम्ही आमच्यासारख्या जागतिक पातळीवरील ब्लू-चिप कंपन्यांच्या बरोबरीला आलो आहोत, शिवाय यामुळे आम्ही आमच्या ग्राहक-केंद्री कारकिर्दीत आणखी एक महत्त्वाचा पल्ला पार करण्यात यश मिळवले आहे.”   

एअरबीएनबीचे गोव्यात ६१ दशलक्ष डॉलर्सचे पर्यटन
Godrej & boyce
युअँडअस होम डिझाईन स्टुडिओचे हेड मनोज राठी यांनी सांगितले, “युअँडअस ट्रेडमार्कमुळे आम्हाला भारतातील सहयोगी व वैयक्तिकृत रिटेल उद्योगक्षेत्रात नवे मापदंड रचण्यात मदत मिळेल. आमच्या स्टुडिओमध्ये किंवा व्हर्च्युअल कन्सल्टेशनमार्फत ग्राहक आमच्या डिझाईन तज्ञांसोबत चर्चा, विचारविनिमय करून आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात साकार करू शकतात, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जागेचे, रचनेचे तपशीलवार लेआऊट्स, सजावट आणि फर्निशिंग यांचा समावेश असलेल्या अंतिम डिझाइन्सचे व्हर्च्युअल रूप त्यांना पाहता येऊ शकते.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here