‘या’ कंपनीने केला 4000 कर्मचाऱ्यांचा ‘कोरोना विमा’

Corona insurance

मुंबई:
कोव्हिड- 19 विरोधात लढणाऱ्या घटकांना अधिक सक्षम करण्यासाठी गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लि. ने भारतातील आपल्या पुरवठा व वितरण साखळीतील 4000 कर्मचाऱ्यांचा (corona insurance) विमा उतरवला आहे. जीपीसीएलचे व्यावसायिक कामकाज सुरळीत चालावे यासाठी चॅनेल भागिदारांच्या पेरोलवर असलेल्या किंवा कंत्राटानुसार काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने आरोग्य विमा उतरवला आहे. कोव्हिड- 19 मुळे हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागल्यास किंवा त्याचा उपचार घ्यावा लागल्यास कर्मचाऱ्याला कॅशलेस उपचार घेता येतील किंवा त्याला 50,000 रुपयांपर्यंतचा वैद्यकीय खर्च दिला जाईल.

एखाद्या कॉर्पोरेटने मोठ्या संख्येने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी (corona insurance) विमा कवच घेण्याची ही पहिली वेळ आहे. गो डिजिट जनरल इन्शुरन्स या सर्वसाधारण विमा कंपनीतर्फे डिजिटल इलनेस समूह विमा योजना पुरवण्यात आली आहे. आरोग्य विम्याअंतर्गत विमा कवच पुरवण्यात आलेल्या या 4000 कर्मचाऱ्यांमध्ये कंत्राटी कामगारवितरण टीम्समालवाहक तसेच माल पुढे नेणारे प्रतिनिधीमाल चढवणारे तसेच माल उतरवणारेलॉजिस्टिक टीम्स व चालकांचा समावेश आहे. याआधी जीसीपीएलने 2675 कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय फायदे पुरवलेले आहेत.
corona insurance
विम्याचा हप्ता भरण्यासाठी केंद्राची सवलत

कंपनीने हाती घेतलेल्या या महत्त्वाच्या उपक्रमाविषयी गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लि. च्या भारत आणि सार्क विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कटारिया म्हणाले, ‘कोव्हिड- 19 मुळे भारतातील समाजाला मोठा धोका निर्माण झाला आहे. जीसीपीएल आपल्या कर्मचाऱ्यांप्रती मग, ते कंत्राटी असोत किंवा थर्ड- पार्टी बांधील आहे. आम्ही त्यांच्या मेहनतीची कदर करतो आणि म्हणूनच त्यांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. म्हणून आम्ही पुरवठा आणि वितरण साखळीचा कणा असलेल्या आमच्या कर्मचाऱ्यांचा (corona insurance) विमा उतरवण्याचा उपक्रम हाती घेतला आम्ही आमच्या कामाच्या सर्वठिकाणी सर्वसमावेशक आणि सुरक्षित देखरेख यंत्रणा कार्यान्वित केली आहे. अशाप्रकारच्या प्रतिबंधात्मक उपक्रमातून आम्ही सातत्याने आमच्या कर्मचाऱ्यांच्या तत्कालीन गरजा व आवश्यकता पूर्ण करण्याचे धोरण राबवत असतो.’
दरम्यान, जीसीपीएलतर्फे आपल्या कारखान्यातील आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी दैनंदिन कोव्हिड भत्ता दिला जात आहे. तांदूळ, पीठ, डाळी, तेल, मीठ इत्यादींचा समावेश असलेले एका महिन्याचे खाद्यान्न पॅकेजही त्यांना देण्यात आले आहे. जीसीपीएलने कंत्राटी कामगारांच्या पगारात कोणतीही कपात केली नसून हे धोरण नियमानुसार राबवले जाईल याची खात्री करण्यासाठी कंपनी सातत्याने कंत्राटदारांच्या संपर्कात आहे.
corona insurance
गुंतवणूक आणि उद्योगजगताच्या अधिक महितासाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here