‘या’ शहरातील लोक राखतात काम आणि आयुष्याचा समतोल

GODREJ

मुंबई :
गोदरेज (godrej) इंटेरियोच्या मेक स्पेस फॉर लाइफ या सर्वेक्षणात 77 टक्के चंदीगढवासियांनी आपले काम आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल स्थिर असल्याचे सांगितलेतर त्यापाठोपाठ 74 टक्के अहमदाबादवासियांनीही हेच मत नोंदवल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या तुलनेत कोलकाता (3 टक्के) आणि दिल्ली (16 टक्के) यांची आकडेवारी पूर्णपणे विरूद्ध असून त्यातून काम व आयुष्यातील मोठा असमतोल दिसून आला आहे.
या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे, की कोलकाता, चेन्नई, हैद्राबाद आणि दिल्लीतील कर्मचारी कामाच्या तणावामुळे आपले कुटुंबीय, मित्रपरिवार आणि आपल्या छंदासाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाहीयेत, तर त्यांच्या तुलनेत अहमादाबाद, पटना, पुणे आणि जयपूरमधल्या कर्मचाऱ्यांचा काम व आयुष्यातील समतोल बराच चांगला आहे. चेन्नईतील तीन चर्तृथांशपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना (77 टक्के) काम व आयुष्य यांच्यातील समतोल साधताना आयुष्य जगण्याचे राहून जात असल्याचे वाटत असून पटनामधे असे वाटणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण 47 टक्के आहे.
मेक स्पेस फॉर लाइफ हे सर्वेक्षण हलक्याफुलक्या प्रकारचे असून त्यात व्यावसायिक यश साध्य करताना आणि काम व आयुष्याचा समतोल साधताना लोकांना कुटुंबियांबरोबर मजबूत नाते निर्माण करणे किंवा मित्रपरिवाराबरोबर चांगला वेळ घालवणे शक्य होत नसल्याचे अधोरेखित करणे हे त्याचे ध्येय आहे. हे सर्वेक्षण 13 शहरांमध्ये घेण्यात आले व त्यात चंदीगड, जयपूर, मुंबई, पटना, कोईम्बतूर, पुणे, लखनौ, हैद्राबाद, कोलकाता, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू आणि अहमदाबाद यांचा समावेश आहे. कामाच्या ताणाचा काम व आयुष्य यांचा समतोल बिघण्यात मोठा वाटा असल्याचेही या सर्वेक्षणात जाहीर करण्यात आले आहे. उदा. हैद्राबाद आणि चेन्नईमधील 74 टक्के कर्मचाऱ्यांनी कामाच्या ताणामुळे कुटुंबासोबत मनसोक्त वेळ घालवता येत नसल्याचे सांगितले आहे, तर असे सांगणाऱ्यांचे पुण्यातील प्रमाण 39 टक्के आहे. त्याचप्रमाणे दिल्लीतील 43 टक्के कर्मचाऱ्यांनी व्यावसायिक आयुष्यामुळे आपल्या छंदाला वेळ देता असल्याचे नमूद केले आहे, तर जयपूरमध्ये 12 टक्के जणांनाही हेच वाटत असल्याचे सर्वेक्षणात नोंदवण्यात आले आहे.

जगभरता उद्भवलेली महामारी व त्यामुळे जाहीर झालेल्या लॉकडाउननंतर भारत व जगभरात कौटुंबिक नाते मजबूत करण्यासाठी अनोखा वेळ मिळाला, जो एरवी मिळणं अवघड होतं. यामुळे येत्या काही वर्षांत सर्वच नात्यांचे बंध आणखी दृढ झालेले असतील.
गोदरेज इंटेरियोचे सीओओ अनिल माथुर म्हणाले, अटीतटीच्या व्यावसायिक आयुष्यामुळे आज व्यावसायिक कर्मचारी कुटुंबाबरोबर दृढ नाते जोडण्यात किंवा मित्रपरिवाराबरोबर चांगला वेळ घालवण्यात खूप कमी पडत आहेत. या सर्वेक्षणानुसार कामाच्या अतिरिक्त तणावामुळे पहिल्या व दुसऱ्या श्रेणीतील शहरांत राहाणाऱ्या भारतीयांना कुटुंब- परिवारासाठी तसेच आपला छंद जोपासण्यासाठी फार कमी वेळ मिळत आहे. सर्वेक्षणातील माहितीनुसार वेगवेगळ्या शहरांतील कर्मचारीवर्ग तणाव आणि बंधनांमुळे आयुष्य पूर्णत्वाने जगण्यात मागे पडत आहेत. लोकांना काम व आयुष्याचा निरोगी समतोल साधणे अवघड झाले असून या असमतोलामुळे नात्यांमध्ये तसेच शारीरिक व मानसिक स्वास्थ्यात तडजोडी कराव्या लागत आहेत. एक ब्रँड या नात्याने गोदरेज इंटेरियो आपल्या नाविन्यपूर्ण आणि आकर्षक डिझाइन असलेल्या फर्निचर श्रेणीच्या मदतीने घरे उजळवून टाकण्यासाठी प्रयत्नशील आहे. आम्ही भारतीयांना विनंती करतोकी त्यांनी त्यांच्या आयुष्यातली पॅशनकुटुंब आणि मित्रपरिवारासाठीप्रियजनांसांठीआपल्या आवडीच्या छंदासाठी आयुष्यात आवर्जून जागा करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here