सोन्याच्या दरात १.३ टक्क्यांची वाढ

मुंबई :
विविध देशांमध्ये कोरोना विषाणूच्या दुस-या लाटेमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनचे निर्बंध लावण्यात आले आहेत. परिणामी बाजारातील भावनांनाही धक्का बसला आहे. यामुळेच सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून आली. जागतिक बँकांकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे मागील आठवड्यात सोन्याचे दर वाढले. मागील आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १.३% नी वाढले. आता विषाणूमुळे पुन्हा आर्थिक मंदी निर्माण केल्याने सोने १८०० डॉलरकडे गेले असल्याचे मत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलनचे रिसर्च एव्हीपी प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
साथ पुन्हा एकदा सर्वत्र पसरल्यामुळे पुन्हा एकदा निर्बंध लागले गेले आहेत. मागील आठवड्यात डब्ल्यूटीआयच्या कच्च्या तेलाच्या दरात ०.२५ टक्क्यांनी घट झाली. जागतिक अर्थव्यवसस्थेत अत्यंत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या देशांना कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह रुग्णांच्या वाढत्या संख्येने मोठा फटका बसत आहे. साथीच्या आजाराचा परिणाम पाहून पुन्हा एकदा बाजारात कच्च्या तेलाची मागणी घसरलेली दिसून आली.
एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशन (ईआयए) च्या मते, अमेरिकी कच्च्या तेलाच्या यादीची पातळी अंदाजे ५.७ दशलक्ष बॅरलपर्यंत वाढली आहे. कच्च्या तेलाची मागणी कमी होत असल्याने ओपेकने पुढील बैठकीनंतर तेल निर्मितीत कपात जाहीर करावी, अशी अपेक्षा आहे.
२० हजार कोटींच्या प्रकल्पांचे उद्या उदघाटन

मागील आठवड्यात एलएमईवरील बेस मेटलच्या दरात वाढ झाली होती. सर्व बेस धातूंपैकी मागील आठवड्यात झिंक हा सर्वाधिक लाभकारक ठरला. गेल्या काही महिन्यांत चीनचे झिंक उत्पादन कमी होते. अलास्का येथील रेड डॉग नावाच्या खाणकाम करणा-या कंपनीच्या मालवाहतुकीच्या दिरंगाईमुळे चीनमधील झिंकचे उत्पादन आधीपासूनच घसरत होते. सलग पाचव्या महिन्यात घट झाल्यामुळे चीनच्या औद्योगिक मागणीवर दबाव निर्माण झाला आहे. विषाणूचा पुन्हा प्रसार होत असल्यामुळे जागतिक मध्यवर्ती बँकांकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे बेस मेटलच्या किंमतींना आधार मिळू शकतो.
मागील आठवड्यात एलएमईवरील तांब्याच्या किंमतीत ५ टक्के वाढ झाली. यामुळे शीर्ष तांबे उत्पादकांकडून पुरवठा वाढण्याची चिंता वाढली आहे. चिली हा तांबे उत्पादक देशांपैकी एक आहे, त्यांनी लाल धातूच्या किंमतीत वाढ दर्शवली आहे.
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here