भूस्खलन होण्यापूर्वीच मिळणार आता सूचना

landslide

मुंबई :
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने (जीएसआय) नुकतेच पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्‍ह्यामध्‍ये आणि तामिळनाडूमधील निलगिरी जिल्‍ह्यामध्‍ये रिजनल लॅण्‍डस्‍लाइड अर्ली वॉर्निंग सिस्‍टम (एलईडब्‍ल्‍यूएस)च्‍या चाचणीला सुरूवात केली आहे. कार्यरत करण्‍यापूर्वी सत्‍यापनासाठी काही पावसाळी वर्षांसाठी या दोन्‍ही ठिकाणी या यंत्रणेची चाचणी करण्‍यात येईल. केंद्रीय कोळसा आणि खाणप्रभारी मंत्री प्रल्हाद जोशी यांनी नुकतेच त्‍यांच्‍या सोशल मीडिया अकाऊण्‍ट्सवरही माहिती पोस्ट केली आहे.
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्‍या जीएचआरएम विभागाचे संचालक डॉ. सैबल घोष म्‍हणाले,”अशा प्रकारचे प्रादेशिक भूस्‍खलनबाबत लवकर चेतावणी देणारे मॉडेल कार्यरत असलेल्‍या इतर विकसित देशांप्रमाणे भारत देखील काही पावसाळी वर्षांसाठी एलईडब्‍ल्‍यूएस मॉडेल्‍सचे प्रत्‍यक्ष सत्‍यापन व चाचणी करणार आहे आणि कार्यरत करण्‍यापूर्वी काही इतर भूस्‍खलन प्रवण राज्‍यांमध्‍ये उपयोजन देखील करणार आहे. जीएसआयने लँडस्‍केप, हवामान व सामाजिक डायनॅमिक्‍स क्षेत्रांमधील भारतीय व युरोपियन संशोधकांच्‍या मोठ्या समूहासह काम केल्‍यानंतर सुरू असलेल्‍या सहयोगात्‍मक आंतरराष्‍ट्रीय संशोधन उपक्रम ‘लँडस्लिप’मध्‍ये हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.”
भारतामध्‍ये शिखर व डोंगराळ भाग भूस्‍खलन प्रवण हिमालय प्रदेश, ईशान्‍य भारताचा हिमालयीन भाग आणि पश्चिमी घाटांमधील १६ राज्‍ये व २ कें‍द्रशासित प्रदेशांपर्यंत पसरलेला आहे. या भूस्‍खलन प्रवण क्षेत्रामध्‍ये १७० हून अधिक जिल्‍ह्यांमधील जवळपास १२.६ टक्‍के भारतीय जमिनक्षेत्राचा (४.२ लाख चौरस किमी) समावेश आहे.
जीएसआय राष्‍ट्रीय प्रकल्‍प ‘नॅशनल लॅण्‍डस्‍लाइड सस्‍पेक्टिबिलिटी मॅपिंग (एनएलएसएम)’ पूर्ण करण्‍याच्‍या टप्‍प्‍यावर आहे, जेथे भारतातील सर्व भूस्‍खलन प्रवण क्षेत्रांसाठी (४.२ लाख चौरस मीटर)भूस्‍खलन संवदेशनशीलता मानचित्राचे प्रमाण १:५०,००० आहे आणि रिमोट-सेन्सिंग व क्षेत्रीय-आधारित इनपुट डेटाचा वापर करत राष्‍ट्रीय भूस्‍खलन यादी तयार करण्‍यात आली आहे. २०१९-२० पर्यंत जीएसआयने या एनएलएसएमप्रकल्‍पामधील एकूण लक्ष्‍यापैकी (३.५७ लाख चौरस मीटर) ८५ टक्‍के लक्ष्‍य पूर्ण केले आहे. देशाच्‍या आपत्ती व्‍यवस्‍थापन योजनेमध्‍ये वापरासाठी हे व्‍यापक जिओ डेटोबेसेस सार्वजनिक क्षेत्रामध्‍ये टप्‍प्‍याटप्‍प्‍याने उपलब्‍ध करून देण्‍यात येत आहेत. या जीआयएस-सक्षम मॅप डेटापैकी ६१ टक्‍के डेटा (२.५५ लाख चौरस मीटर) मोफत डाऊनलोडिंगसाठी आणि कोणत्‍याही भागधारकाद्वारे वापरासाठी जीएसआयच्‍या भुकोश मॅप पोर्टलवर (http://bhukosh.gsi.gov.in/Bhukosh/Public) अपलोड करण्‍यात आले आहे. वरील अगोदरच अपलोड करण्‍यात आलेल्‍या एनएलएसएम डेटाबेसमध्‍ये १८ भूस्‍खलन प्रवण राज्‍यांमधील व २ केंद्रशासित प्रदेशांमधील कोणत्‍याही भागधाकांच्‍या वापरासाठी क्षेत्रीय-सत्‍यापन केलेल्‍या जिओ-पॅरामेट्रिक विशेषतांसह मॅप केलेला ५२,१४६ लॅण्‍डस्‍लाइड पॉलिगॉन डेटा आणि २५,१८४ लॅण्‍डस्‍लाइड पॉइण्‍ट डेटा आहे. या प्रयत्‍नामध्‍ये जीएसआयचा एनएलएसएम डेटाबेस मध्‍यम प्रमाणावर सर्वात प्रभावी मूलभूत भूमाहिती देणारे साधन आहे, जे भारताच्‍या डोंगराळ भागांमधील पायाभूत सुविधा विकास व नियोजनामध्‍ये वापरण्‍यात व एकीकृत करण्‍यात आले पाहिजे. योग्‍यरित्‍याअंमलबजावणी केल्‍यास हे साधन मानवी कृत्‍यांमुळे प्रचंड नुकसान करू शकणा-या अनेक नवीन भूस्‍खलनांना टाळू शकते.
महाराष्ट्र स्टार्टअप वीकमध्ये कर्झा टेक्नोलॉजीची निवड
landslide
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्‍या जीएचआरएम विभागाचे संचालक डॉ. सैबल घोष म्‍हणाले,”भूस्‍खलन संवदेशनशीलता मॅप हे उत्‍कृष्‍ट स्‍थानिक अवकाशीय माहिती देणारे साधान आहे. हे साधन जमिनीवापरानुसार झोनिंग नियमनांच्‍या अंमलबजावणीसाठी वापरता येऊ शकते. भारतामध्‍ये नि‍लगिरी जिल्‍हा व नैनीताल या साधनाचा वापर करत आहेत, पण इतर भूस्‍खलन प्रवण राज्‍यांनी देखील डोंगराळ भाग विकास व व्‍यवस्‍थापनासाठी या महत्त्वपूर्ण भू माहिती देणा-या साधनाचा वापर करण्‍यास सुरूवात केली पाहिजे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here