‘जीडब्लूएम’ आणणार महाराष्ट्रात प्लांट

मुंबई :
मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये आज जीडब्ल्यूएमने आज महाराष्ट्र सरकारबरोबर सामंजस्य ठरावावर (एमओयू) स्वाक्षरी केल्याचे जाहीर केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भारतातील चीनचे राजदूत सुन वीडाँग यांच्या उपस्थितीत आज एमओयूवर स्वाक्ष-या करण्यात आल्या. तळेगावमध्ये एका अतिप्रगत वाहन उत्पादन कारखान्यासाठी गुंतवणूक करणार असल्याचे या एमओयूद्वारे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. हा कारखाना जागतिक दर्जाच्या नवीनतम तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. त्याचबरोबर बेंगळुरू येथे संशोधन व विकार (आरअँडडी) केंद्र सुरू केले जाणार आहे. यामुळे ३०००हून अधिक लोकांसाठी टप्प्याटप्प्याने रोजगार निर्माण होणार आहे.
जीडब्ल्यूएमच्या भारतीय उपकंपनीचे अध्यक्ष जेम्स यांग आणि व्यवस्थापकीय संचालक पार्कर शि तसेच भारतातील चीनचे राजदूत सन वीडाँग आणि महाराष्ट्र सरकारचे माननीय उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यातील व्हर्च्युअल बैठकीद्वारे करारावर स्वाक्ष-या करण्याचा समारंभ झाला. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्रीही या व्हर्च्युअल समारंभाला उपस्थित होते. तळेगावमध्ये एक पूर्णपणे आधुनिक आणि जागतिक दर्जाचा उत्पादन कारखाना उभारण्याची अधिकृत घोषणा यावेळी करण्यात आली.

‘हे’ मास्क मारणार कोविडचे विषाणू 

पार्कर शि या संस्मरणीय ठरावाबद्दल म्हणाले, “आम्हाला संपूर्ण पाठिंबा दिल्याबद्दल तसेच एक दीर्घकालीन व परस्परलाभाचा सहयोग प्रस्थापित करण्यासाठी सहाय्य पुरवल्याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचे आभारी आहोत. हा सहयोग दोहोंसाठी उत्तम व्यावसायिक विधान ठरेल, अशी आशाही आम्ही व्यक्त करतो. तळेगावमधील हा कारखाना मोठ्या प्रमाणावर स्वयंचलित असेल. यामध्ये उत्पादनाच्या अनेक प्रक्रियांमध्ये प्रगत रोबोटिक तंत्रज्ञानाचे एकात्मीकरण केले जाईल. एकंदर भारतात १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. जागतिक दर्जाची इंटेलिजंट व अव्वल उत्पादनांच्या निर्मितीसाठी, संशोधन व विकास केंद्रासाठी, पुरवठा साखळी उभारण्यासाठी आणि टप्प्याटप्प्याने ३०००हून अधिक रोजगार निर्माण करण्यासाठी ही गुंतवणूक वापरली जाईल.”
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here