‘हि’ कंपनी देणार विद्यार्थ्यांना शिक्षण आणि नोकरीही 

नवी दिल्ली :
टेकबी या एचसीएलच्या अर्ली करिअर प्रोग्रामने १०+२ विद्यार्थ्‍यांसाठी फ्यूचर-रेडी कौशल्‍यांसह सुसज्‍ज करत आयटी अभियांत्रिकी रोजगार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.  हा प्रोग्राम एचसीएलमधील एण्‍ट्री-लेव्‍हल आयटी रोजगारांसाठी तंत्रज्ञानदृष्‍ट्या व व्‍यावसायिकदृष्‍ट्या विद्यार्थ्‍यांना सक्षम करणार असून, उमेदवारांना सॉफ्टवेअर इंजीनिअर्स बनण्‍यासाठी १२ महिने प्रशिक्षण घ्‍यावे लागते. एचसीएलमध्‍ये काम करत असताना विद्यार्थी ग्रॅज्‍युएशन डिग्री प्रोग्राममध्‍ये देखील नोंदणी करू शकतात. बीआयटीएस पिलानी व सस्‍त्र युनिव्‍हर्सिटी सारखी प्रतिष्ठित विद्यापीठे हा अभ्‍यासक्रम ऑफर करत आहेत. 

प्रोग्राममध्‍ये नोंदणी करण्‍याची इच्‍छा असलेल्‍या इच्‍छुक विद्यार्थ्‍यांना प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. हा प्रोग्राम क्‍लासरूम प्रशिक्षण आणि ऑन-दि-जॉब प्रशिक्षणाची सुविधा देतो, ज्‍यामुळे त्‍यांना आत्‍मनिर्भरपणे प्रोग्राम पूर्ण करता येईल. प्रशिक्षणाच्‍या संपूर्ण कालावधीदरम्‍यान नोंदणीकृत विद्यार्थ्‍यांना प्रतिमहिना १०,००० रूपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. 
एचसीएलतर्फे सर्वोत्तम प्रतिभांना नियुक्‍त करण्‍याच्‍या आणि त्‍यांना त्‍यांच्‍या करिअरच्‍या सुरूवातीच्‍या टप्‍प्‍यामध्‍ये आर्थिकदृष्‍ट्या स्‍वावलंबी बनण्‍यामध्‍ये सक्षम करण्‍याच्‍या हेतूने वर्ष २०१७ मध्‍ये हा प्रोग्राम सुरू करण्‍यात आला. आतापर्यंत, २००० हून अधिक विद्यार्थ्‍यांनी टेकबी प्रोग्राम पूर्ण केला आहे आणि आता एचसीएलसह काम करत आहेत. सध्‍याच्‍या अनपेक्षित काळामध्‍ये टेकबी विद्यार्थ्‍यांना या प्रोग्रामचा भाग म्‍हणून सहयोग जोडलेल्‍या आघाडीच्‍या विद्यापीठांमधून पदवी मिळवण्‍यामध्‍ये सक्षम ठरू शकणार असल्याचे एचसीएलचे म्हणणे आहे. 

आयआयटी, जेईईच्या विद्यार्थ्यांसाठी ‘हि’ सुविधा


टेकबीची प्रमुख वैशिष्‍ट्ये:

 • जॉब फर्स्‍ट – भारताची आघाडीची आयटी कंपनी एचसीएलसह रोजगार मिळण्‍याची खात्री.
 • आर्थिकदृष्‍ट्या स्‍वावलंबी – पहिल्‍या महिन्‍यापासून वेतन सुरू होत असल्‍यामुळे विद्यार्थी आर्थिकदृष्‍ट्या स्‍वावलंबी बनतात.
 • उच्‍च शिक्षण – बीआयटीएस पिलानी व सस्‍त्र युनिव्‍हर्सिटी अशा भारताच्‍या प्रतिष्ठित तंत्रज्ञान संस्‍थांमधून पदवी शिक्षण मिळते.
 • टेकबी – एचसीएलचा अर्ली करिअर प्रोग्राम खालील विभागांमध्‍ये विभागण्‍यात आला आहे:
 • फाऊंडेशन ट्रेनिंग प्रोग्राम – रोजगारासाठी सुसज्‍ज प्रतिभा निर्माण करण्‍यासाठी टेक्निकल फाऊंडेशन ट्रेनिंग.
 • तंत्रज्ञान / क्षेत्रीय प्रशिक्षण – देण्‍यात आलेल्‍या भूमिकेप्रती सर्व कार्य पूर्ण होण्‍याच्‍या खात्रीसाठी स्ट्रिम-‍स्‍पेसिफिक ट्रेनिंग.  
 • रोल स्‍पेसिफिक प्रशिक्षण – व्‍यावसायिक सराव कालावधीदरम्‍यान प्रत्‍यक्ष प्रकल्‍पकार्याचा अनुभव.
 • उमेदवारांना प्रशिक्षणाच्‍या या १२ महिन्‍यांदरम्‍यान माहिती तंत्रज्ञानाची मुलभूत माहिती, संबंधित सॉफ्टवेअर टूल्‍स, प्रक्रिया व जीवन कौशल्‍ये देखील शिकण्‍यास मिळतील.
 • प्रशिक्षण यशस्‍वीरित्‍या पूर्ण केल्‍यानंतर उमेदवारांना एचसीएल टेक्‍नोलॉजीजमध्‍ये अॅप्‍लीकेशन व इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर सपोर्ट, टेस्टिंग व कॅड सपोर्ट क्षेत्रांमधील प्रतिष्ठित प्रकल्‍पांमध्‍ये काम करण्‍याची संधी मिळते.
 • आर्थिक सहाय्यतेचे अशा प्रकारे नियोजन केले जाते की, पालक किंवा विद्यार्थ्‍यांना आर्थिक चुणचुण जाणवणार नाही. प्रोग्रामवर १०० टक्‍के फी माफ (प्रशिक्षणादरम्‍यान ९० टक्‍के आणि त्‍यापेक्षा अधिक गुण मिळवल्‍यास) आणि ५० टक्‍के फी माफ (प्रशिक्षणादरम्‍यान ८५ ते ९० टक्‍क्‍यांदरम्‍यान गुण मिळवल्‍यास) मिळवा.
 • भारतभरातील, तसेच २०१९ व २०२० मध्‍ये बारावीमध्‍ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अर्ज करण्‍यास पात्र आहेत. विद्यार्थी एचसीएल एसएटी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्‍याकरिता https://registrations.hcltechbee.com/HCL/ येथे भेट देऊ शकतात. नोंदणीची अंतिम तारीख ३० जून २०२० आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here