‘हा’ विमा देणार ‘कोरोना कवच’ सुरक्षा 

मुंबई :
एचडीएफसी एर्गोने ‘कोरोना कवच’ पॉलिसी बाजारात आणली आहे. ही नवीन भरपाई आरोग्य पॉलिसी (indemnity health policy) कोविड-१९च्या उपचारांचा भाग म्हणून रुग्णालयात दाखल व्हावे लागल्यास येणाऱ्या वैद्यकीय खर्चासाठी संरक्षण देणार आहे. सरकारने मान्यता दिलेल्या निदान केंद्रांमध्ये कोविड चाचणी पॉझिटिव्ह आलेले पॉलिसीधारक रुग्ण भरपाई मिळवण्यास पात्र ठरतील. त्याशिवाय कोविड-१९वरील उपचारांसोबतच अन्य विकारांच्या (को-मॉर्बिडिटीज) उपचारांच्या खर्चाची भरपाईही या पॉलिसीखाली दिली जाणार आहे.
सध्याच्या साथीमुळे व्यक्तींच्या आरोग्याला गंभीर स्वरूपाचा धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर कोविड-१९ उपचारांच्या मोठ्या खर्चामुळे आर्थिक फटकाही बसत आहे. मात्र आपण हळूहळू या ‘साथीच्या पलीकडे बघण्याची’ आणि या नवीन सामान्य परिस्थितीशी आत्मविश्वासाने जुळवून घेण्याची तयारी केलीच पाहिजे. या विषाणूवरील उपचारांचा भाग म्हणून रुग्णालयात दाखल व्हावे लागल्यास ‘कोरोना कवच’ पॉलिसी धारकांना वैद्यकीय खर्चाची भरपाई देणार आहे. 

‘झिंगिवीर-एच’ कोरोनाचा प्रसार रोखू शकते’

यामध्ये कोविड-१९ आजारासोबत असलेल्या अन्य विकारांवर उपचार करावे लागल्यास त्यासाठीच्या खर्चाची भरपाई दिली जाण्याचीही तरतूद आहे. कोविड-१९मुळे रुग्णालयात दाखल होण्याच्या हेतूने रस्तामार्गे जाणाऱ्या रुग्णवाहिकेची सुविधा वापरल्यास त्याच्या खर्चासाठी भरपाई देण्याची तरतूदही या पॉलिसीमध्ये आहे. जे रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वत:च्या घरात राहूनच उपचार घेतील त्यांनाही पॉलिसीखाली होम केअर एक्स्पेन्सेस (१४ दिवसांच्या कालावधीपर्यंत) लाभ दिला जाईल. याशिवाय, आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी (आयुष्य) आदी वैद्यकीय व्यवस्थांमध्ये इनपेशंट केअर उपचारांसाठी आलेल्या खर्चाची भरपाईही या पॉलिसीद्वारे दिली जाणार आहे. पॉलिसीधारक हॉस्पिटल डेली कॅशसाठीही पात्र ठरतील. ही रोख रक्कम प्रतिदिवसाच्या इन्शुअर्ड रकमेच्या ०.५ टक्के असून, पॉलिसीच्या कालावधीत कमाल १५ दिवसांपर्यंत ती दिली जाईल.
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here