आता मिळणार ‘ड्रोन’लाही विमा संरक्षण

 मुंबई :
एचडीएफसी एर्गोने नॉन-लाइफ विमा संरक्षण देणाऱ्या कंपनीने ट्रोपोगो या डीप टेक स्टार्ट-अपशी भागीदारी करून व्यावसायिक ड्रोन मालक व ऑपरेटर्सना मालमत्तेचे नुकसान व शारीरिक दुखापतींसाठी थर्ड पार्टी लायबिलिटी दाव्यांचे संरक्षण देऊ केले आहे. ही भारतातील नॉन-लाइफ विमा क्षेत्रातील अशा प्रकारची पहिलीच योजना आहे. ती ‘पे अॅज यू फ्लाय’ संकल्पनेवर ग्राहकांना मागणीनुसार दिली जाईल.
सध्याच्या साथीच्या काळात कोविड-१९चा सामना करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार अनमॅन्ड एरिअल व्हेइकल्स (यूएव्ही) किंवा ड्रोन्सचा विचार करत आहेत किंवा सक्रिय वापरही करत आहेत. संपूर्ण जग ठप्प झालेले असताना ड्रोन्स सार्वजनिक देखरेख, गर्दीवर नियंत्रण या कामांत कार्यक्षम व लाभदायक पद्धतीने उपयुक्त ठरत आहेत; काही भागांत तर औषधांसारख्या अत्यावश्यक वस्तू पोहोचवण्याच्या कामातही ड्रोन्सचा उपयोग केला जात आहे. शिवाय भविष्यकाळात मनुष्यबळ काम करण्यास असमर्थ ठरल्यास विविध व्यवसायांच्या अनेकविध कार्यांमध्ये ड्रोन्सचा वापर मध्यवर्ती भूमिका बजावेल अशी शक्यता आहे.

ईलेक्ट्रिक वाहनांसाठी ‘या’ दोन कंपन्या आल्या एकत्र

ड्रोन्‍स व्‍यावसायिक युजर्सना लाभ देत असले तरी तृतीय-पक्ष मालमत्तांच्‍या सुरक्षिततेबाबतची समस्‍या कायम आहे. या समस्येवर उपाय म्हणून एचडीएफसी एर्गोची नवीन पॉलिसी व्यावसायिक ड्रोन मालक/ऑपरेटर्सना थर्ड पार्टी लाएबिलिटी दाव्यांचे संरक्षण पुरवणार आहे. यामुळे सर्वेक्षण, मॅपिंग, देखरेख, आपत्कालीन मदतीचे उपक्रम, नागरी प्रशासन सेवा, सण-उत्सवांच्या काळातील वापर, मालमत्ता व्यवस्थापन, प्रवास- पर्यटन आदी उपक्रम राबवताना काही आर्थिक नुकसान झाल्यास, त्याबद्दल भरपाई मिळू शकेल. 
याबद्दल एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश कुमार यांनी सांगितले कि, आज सोहळ्यांमध्ये किंवा अन्य व्यावसायिक कामकाजात ड्रोन्स अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. ड्रोन्स चालवण्यासाठी कुशल व्यावसायिकांची गरज भासते. मात्र, ड्रोन्स चालवण्यातील अपयशामुळे किंवा उपकरणांच्या अपयशामुळे त्रयस्थ पक्षाचे नुकसान होऊ शकते. हे लक्षात घेऊन आम्ही आमच्या हवाईप्रवास विमा विभागाद्वारे हे संरक्षण देऊ करत आहोत. उद्योगक्षेत्रातील अशा प्रकारची ही पहिलीच विमा योजना आहे. यामुळे व्यावसायिक स्तरावर ड्रोन चालवत असताना ड्रोन मालक व वैमानिकांना थर्ड पार्टी लायबिलिटीपासून संरक्षणाचे कवच प्राप्त होईल.”


ट्रोपोगोचे संस्थापक व प्रोडक्ट ओनर संदीपन सेन म्हणाले, “थर्ड-पार्टी लाएबिलिटी विमा हा ड्रोन चालवण्यासाठी सक्तीचा आहे आणि भारतातील ड्रोन मालक समुदायाकडूनही अशा प्रकारच्या विम्याची मागणी होती. दुर्दैवाने आत्तापर्यंत कोणत्याही विमाकंपनीने अशा प्रकारचे संरक्षण आणि ते डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून खरेदी करण्याची लवचिकता पुरवली नव्हती. ही समस्या आमच्या लक्षात आली आणि ड्रोन मालकांसाठी तसेच ऑपरेटर्ससाठी भारतातील पहिले मागणीवर आधारित ‘पे अॅज यू फ्लाय’ थर्ड पार्टी लाएबिलिटी विमा संरक्षण देण्यासाठी आम्ही एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्ससोबत भागीदारी केली. हे एक स्मार्ट, परवडण्याजोगे आणि हेतूची पूर्तता करणारे उत्पादन आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here