पाच हजार लिटर्स सॅनिटायझर्स वाटणारा ‘हिरो’

Hero motocorp, corona,

मुंबई :
कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्यामुळे विविध कंपन्यांनी याकामी सर्वसामांन्याना आपापल्यापरीने सहकार्य करायला सुरुवात केली आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या मदत निधीमध्ये आर्थिक मदत करण्यासोबतच अनेक कंपन्या कोरोनासोबत लढण्यासाठी मास्क, सॅनिटायझर्स आदींसह गरजूना दोनवेळचे अन्न देण्यातही पुढाकार घेत आहेत. हिरो (hero) मोटोकॉर्प या आघाडीच्‍या मोटरसायकल्‍स व स्‍कूटर्स उत्‍पादक कंपनीनेही यामध्ये आपला सहभाग नोंदवत देशभरात आजवर सुमारे पाच हजार लीटर्सहून अधिक सॅनिटायझर्सचे वाटप केले आहे. हे सॅनिटायझर्स  त्यांनी स्वतःच बनवले आहे. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी २२ मार्चपासून कंपनीने गाड्यांची निर्मिती बंद केली आहे.

६० फर्स्‍ट-रिस्‍पॉण्‍डर मोबाइल अॅम्‍बुलन्‍स :

गेल्‍या तीन आठवड्यांपासून हिरो मोटोकॉर्पच्‍या उत्‍पादन व सीएसआर टीम्‍स या सॅनिटायझर्सचे उत्‍पादन व वितरणामध्‍ये सामील झाल्‍या आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने सांगितलेल्‍या मार्गदर्शकतत्त्वांनुसार हे सॅनिटायझर्स बनवले जात आहेत. हिरो (hero) मोटोकॉर्पने यापूर्वीच चार लाखांहून (४००,०००) अधिक संरक्षणात्‍मक फेस-मास्‍कचे वाटप देखील केले आहे. त्याचप्रमाणे कंपंनीने ६० फर्स्‍ट-रिस्‍पॉण्‍डर मोबाइल अॅम्‍बुलन्‍स विकसित केल्‍या आहेत. देशातील ग्रामीण व दूरस्‍थ भागांमधील वापरासाठी अधिका-यांकडे या रूग्‍णवाहिकांचे वितरण करण्‍यात येईल. कंपनीने बचावकार्यांमध्‍ये वापरासाठी देशभरातील विविध अधिका-यांना २००० मोटरसायकल्‍स देखील दान केल्‍या आहेत.
Hero motocorp, corona,
https://thebusinesstimes.in/special-helpline-for-odisha-labour/

देशभरातील हिरो (hero) मोटोकॉर्पच्‍या उत्‍पादन केंद्रांमधील कॅन्‍टीन किचन्‍स समुदायासाठी भोजन तयार करण्‍यामध्‍ये वापरण्‍यात येत आहेत. कंपनीने तीन लाखांहून (३००,०००) अधिक भोजनांचे वाटप केले आहे आणि दररोज दिल्‍ली-एनसीआर, राजस्‍थान, हरियाणा, उत्तराखंड, आंध्रप्रदेश व गुजरातच्‍या विविध भागांमध्‍ये स्‍थलांतरित कामगार, रोजंदारी मजूर व बेघर कुटुंबांना १५,००० हून अधिक भोजनांचे वाटप केले जात आहे. हिरो (hero) मोटोकॉर्पने राजस्‍थान, दिल्‍ली, महाराष्‍ट्र व केरळ या राज्‍यांमध्‍ये ६,००० हून अधिक रेशन किट्सचे देखील वाटप केले आहे आणि कंपनीची हा उपक्रम सुरूच ठेवण्‍याची योजना आहे.  

हिरोने (hero) दिले १०० कोटींचे अर्थसहाय्य  :

हिरो ग्रुपने भारतातील सध्‍या सुरू असलेल्‍या कोविड-१९ बचावकार्यांना मदतीचा हात म्‍हणून १०० कोटी रूपयांचे (१४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) आर्थिक साह्य केले आहे. यापैकी पन्‍नास टक्‍के रक्‍कम म्‍हणजेच ५० कोटी रूपये पीएम केअर्स फंडामध्‍ये दान करण्‍यात आली आहे आणि उर्वरित ५० कोटी रूपये इतर बचावकार्यांमध्‍ये वापरली जात आहे. भारतातील हरियाणा राज्‍यामधील धारूहेरा येथे हिरो ग्रुपद्वारे संचालित बीएमएल मुंजाळ युनिव्‍हर्सिटीने स्‍थानिक आरोग्‍य विभागाला त्‍यांचे २००० बेड्स असलेले हॉस्‍टेल आयसोलेशन व उपचार कक्ष म्‍हणून वापरण्‍यास दिले आहे.
Hero motocorp, corona,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here