लॉकडाऊनमध्येही घरांची विक्री तेजीत

lockdown, housing

मुंबई :
​कोरोनामुळे​ देशभरात सुरु असलेल्या लॉकडाउनचा (lockdown) परिणाम विविध उद्योगांवर नकारात्मक झाला असला तरी, रियल ईस्टेटवर त्याचा तितकासा परिणाम न झाल्याचेच प्रथमदर्शनी समोर येत आहे. ​लॉकडाऊनच्या (lockdown) काळातही डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर करून विविध विकासकांच्या प्रकल्पांतील २४० घरे आणि ६२ व्यावसायिक जागांचे सुमारे २५२ कोटी रुपये किंमतीचे खरेदी-विक्री व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण केल्याची महिती ऑनरॉक ग्रुपच्यावतीने देण्यात आली आहे. यापैकी ८५ कोटी रुपये किंमतीचे ११७ व्यवहार (४९ टक्के) कोरोनाचा सर्वाधिक प्रसार असलेल्या एमएमआर क्षेत्रातले आहेत.
HOUSING, lockdown
https://thebusinesstimes.in/uddhav-thackeray-declares-permission-for-industry-on-condition/

लॉकडाऊनमुळे (lockdown) बांधकाम प्रकल्पांच्या साईट व्हिजीट २५ मार्चपासून बंद झाल्या आहेत. त्यानंतरही डिजिटल सेलच्या माध्यमातून २१४ कोटी ६० लाख रुपये किंमतीची २४० घरे आणि ३७ कोटी रुपये किंमतीच्या व्यावसायिक जागा विकण्यात ऑनरॉकला यश आले आहे. विक्री झालेल्या घरांची किंमत ही ७० लाख आणि दीड कोटी रुपयांच्या दरम्यानची आहे. तर, कार्यालयीन जागा ६० लाख रुपये किंमतीच्या आसपास आहेत.लॉकडाऊननंतरच्या पहिल्या दहा दिवसांत काम जवळपास बंद झाले होते. मात्र, त्यानंतर जे खरेदी-विक्री व्यवहार अंतिम टप्प्यात होते आणि जिथे चर्चा सुरू होती त्यापैकी काही व्यवहार आम्ही यशस्वीरीत्या पूर्ण केल्याची माहिती ऑनरॉकचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी दिली. नामांकित विकासकांसोबतची भागीदारी आणि खरेदीदारांना दिलेल्या सवलती हे या यशाचे गमक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
https://thebusinesstimes.in/gold-is-shining-again-in-investment-market/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here