कसा सुरु करायचा स्वत:चा ‘स्टार्टअप’ ?

सध्या दिवस सुरु आहेत लॉकडाउनचे.
आणि त्यामुळे आपण सगळेजण अत्यंत अनिश्चेने घरामध्ये अडकून पडलो आहोत. त्यातही अनेक तरुण, ज्यांनी या वर्षारंभाला स्वत:चे स्टार्टअप सुरु करण्याचे न्यूइअर रिझ्युल्युशन केले होते, त्यांना तर आता काहीच करता येत नसणार. कारण कोणाला भेटणे होत नाही. काही ठोस ठरवता येत नाही. त्यातच आज संपेल उद्या संपेल असे वाटत असतानाच नेमके देशातील कोरोनाचे रुग्ण आणि पर्यायाने लॉकडाउन वाढतच आहे.
गेल्या पन्नासेक दिवसांमध्ये देशाच्या आणि जगाच्याही अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण आला. अर्थमंत्री निर्मला सितारामन या गेले चार दिवस ‘आत्मनिर्भर भारत’ पॅकेजमधील विविध बाबींचा उलगडा करून सांगत आहेत. दुसरीकडे देशातील एकूण नोकरी-व्यवसायावर नाही म्हटले तरी मंदीचे सावट दाटून आले आहे. अनेक कंपन्यांनी पगारकपात आणि त्याचसोबत आता कर्मचारी कपात करायला सुरुवात केली आहे.
पण जेव्हा सगळ्या बाजूने संकटे येऊ लागली आहेत, असे वाटत असते तेव्हाच आपला धिरोदात्तपणा सिध्द होत असतो. आणि व्यावसायिक होण्यासाठी हाच धिरोदात्तपणा कामी येत असतो. लॉकडाउन संपल्यानंतर नव्याने नोकरीभरती सुरु होईल अशी कुठलीच शक्यता दिसत नाही. कारण काही कंपन्या आता जात्यात आहेत तर उरलेल्या सुपात. त्यामुळे अशावेळी कोणावर विसंबून राहण्यापेक्षा स्वत:च एखादा उद्योग सुरु करणे श्रेयस्कर ठरू शकते.
हा स्वत:चा उद्योग/ स्टार्टअप कसा सुरु करायचा याबद्दलचा हा खास व्हिडीओ…. 
https://www.youtube.com/watch?v=HsjBPG-JuWQ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here