कोण आहे एचपीचा नवा ‘ग्लोबल पार्टनर’?

नवी दिल्ली :
एचपीच्यावतीने त्यांची विशेष निर्मिती असलेला अॅम्प्लिफाय सादर करण्यात आला. एचपीचा हा अशाप्रकारचा पहिलाच ग्लोबल1 चॅनल पार्टनर उपक्रम आहे. डिजिटल बदल आणि ग्राहकांच्या खरेदीच्या सवयी सातत्याने बदलत आहेत. अशा परिस्थितीत प्रगतीला चालना देणारी माहिती, क्षमता आणि सहकार्य साधने (इनसाइट, कॅपॅबिलिटीज आणि कोलॅबरेशन टूल्स) या एकाच, एकीकृत स्ट्रक्चरवर उभारलेल्या एचपी अॅम्प्लिफायमुळे उपलब्ध होतील. १ नोव्हेंबर २०२० पासून व्यावसायिक भागीदारांसाठी हा उपक्रम खुला होईल. तर, रीटेल भागीदारांसाठी २०२१ च्या दुसऱ्या सहामाहीत हा उपक्रम उपलब्ध होणार आहे.
एचपीची सर्वोत्कृष्ट भागीदार उत्पादने, साधने आणि प्रशिक्षणांना एकाच उपक्रमात अंतर्भूत करत एचपी अॅम्प्लिफायने गुंतागुंत काढून टाकली आहे. परिणामी, भागीदारांना या उपक्रमातून अनेक फायदे मिळतात आणि ग्राहकांशी अधिक सखोल पातळीवर जोडले जाणे शक्य होते. आता फक्त दोन अनोखे ट्रॅक्स यात आहेत – सिनर्जी आणि पॉवर. यातील स्पष्ट कॉम्पेनसेशन लेव्हलसह एचपी अॅम्प्लिफाय भागीदारांना मूल्यवर्धित सेवा आणि क्षमतांमध्ये गुंतवणूक करण्याची लवचिकता प्रदान करते. या क्षमतांमध्ये भागीदारांकडून जितकी अधिक गुंतवणूक केली जाईल तितके त्यांना अधिक लाभ मिळतील.
‘जल है तो कल है’

“आजच्या काळातील ग्राहकाला अधिक सुव्यवस्थित, ऑटोमेटेड आणि वैयक्तिक अनुभवांची अपेक्षा असते. या बदलत्या वातावरणात पुढे जाण्याची नवी गुरुकिल्ली आहे डेटा. त्याचप्रमाणे आपल्या ग्राहकांशी एक बाजारपेठ म्हणून नव्हे तर एक व्यक्ती म्हणून नाते निर्माण करणेही आवश्यक आहे,” असे एचपीचे मुख्य वाणिज्य अधिकारी ख्रिस्तोफ शेल म्हणाले. “एचपी अॅम्प्लिफायमुळे भागीदारांना एचपीसोबत व्यवसाय करणे सोपे होणार आहेच. त्याचप्रमाणे नव्याने येणाऱ्या ट्रेंड्सचा लाभ घेणे आणि ग्राहकांच्या खरेदीच्या बदलणाऱ्या सवयींनुसार या मार्गावर महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी आजच्या आणि भविष्यातीलही परिस्थितींमध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्या व्यवसायाला नवी दिशा देण्यातही याचा फायदा होणार आहे.”
एकूण आयटी इंडस्ट्री आणि विशिष्ट माध्यमाचा विचार केला तर आहे त्याच पद्धतीचा व्यवसाय करणे हा आता पर्यायच उरलेला नाही. एचपी अॅम्प्लिफाय सादर करून एचपीने या बदलांवर स्वार होण्याचे धाडसी पाऊल उचलले आहे. यातून ते भागीदारांना भविष्यातील प्रगती आणि अधिक समृद्ध ग्राहकानुभव देण्यासाठी सक्षम करणार आहेत.
“बाजारपेठेसंदर्भातील दृष्टिकोन आणि आपल्या ग्राहकांसोबत आपण कसे जोडले जातो याबाबतीत नवा मार्ग जोखण्याची प्रचंड संधी एचपी आणि त्यांच्या भागीदारांसमोर आहे,” असे एचपी इंडिया मार्केटच्या चॅनल सेल्सचे प्रमुख गुरप्रीत ब्रार म्हणाले. “या संधीचा लाभ घेण्यासाठी नव्या डिजिटल-फर्स्ट व्यवसाय मॉडेलचा अंगिकार करणे आवश्यक आहे. आमच्या एकत्रित क्षमता अधिक बळकट करण्यासाठी आमच्या परिसंस्थेत योग्य ती गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने आम्ही एकत्र पुढे जात आहोत,” असे ते म्हणाले.
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here